31 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषसशस्त्र बांगलादेशी तस्करांकडून बीएसएफ जवानाचा अपहरणाचा प्रयत्न!

सशस्त्र बांगलादेशी तस्करांकडून बीएसएफ जवानाचा अपहरणाचा प्रयत्न!

सीमा सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने याबाबतची दिली माहिती

Google News Follow

Related

बांगलादेशातील सशस्त्र तस्करांनी त्रिपुरातील एका सीमा सुरक्षा दलातील जवानाची शस्त्रे आणि रेडिओ संच हिसकावून घेत त्याचे अपहरण करून बांगलादेशात नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. सीमा सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने या बाबतची माहिती दिली.

रविवारी संध्याकाळी सीमा सुरक्षा दलाने त्यांच्या समकक्ष असणाऱ्या बॉर्डर गार्ड्स बांगलादेश (बीजीबी) सोबत कमांडंट स्तरावर ध्वज बैठक घेतली. त्यावेळी शस्त्रे आणि रेडिओ सेट परत करण्यात आला.‘बीएसएफ कॉन्स्टेबल भोळे हे १५० बीएन बीएसएफच्या बॉर्डर आउटपोस्ट कलामचेरा परिसरात भारत-बांग्लादेश सीमा कुंपण गेट क्रमांक १९६ येथील चौकीवर कर्तव्य बजावत होते आणि त्यांना कुंपण गेट चालविण्याचे काम देण्यात आले होते.

दुपारी दीडच्या सुमारास बांगलादेशी हल्लेखोरांचा एक मोठा गट बेकायदा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून साखरेची तस्करी करण्याच्या उद्देशाने कुंपण गेटजवळ जमा झाला. पुढे त्यांनी अपमानास्पद भाषा सुरू केली आणि ड्युटीवर असलेल्या बीएसएफ कॉन्स्टेबलला चिथावणीखोर भाषा आणि अश्लील हावभाव करून भडकवले. कॉन्स्टेबल भोळे हे बदमाशांना पांगवण्याचा आणि गेटच्या कुंपणासमोरून होणाऱ्या तस्करीला आळा घालण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

हे ही वाचा:

मालदीवने दाखवली पॅलेस्टाइनप्रति एकजूटता

गौतम गंभीरने सोडले मौन. म्हणाला, ‘भारतीय संघाचे प्रशिक्षक व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा सन्मान नाही’

एल्विश यादवकडून आपसमर्थक यूट्यूबर ध्रुव राठी याचे लागेबंधे उघड!

निवडणूक आयोगाने मान्य केली चूक म्हणाले, उन्हाळ्यापूर्वी निवडणूका व्हाव्यात!

बांगलादेशातील तस्करांनी कॉन्स्टेबल भोळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि त्याला बांगलादेशच्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न केला. त्याचे अपहरण करण्याच्या प्रयत्नात त्यांनी रेडिओ सेटसह त्याचे वैयक्तिक शस्त्रही हिसकावले. ‘कॉन्स्टेबल भोळे पळून जाण्यात यशस्वी झाला परंतु बांबूच्या काठ्या आणि लोखंडी काठीने त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात तो जबर जखमी झाला,’ असे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले. त्यानंतर दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत कमांडंट स्तरावरील ध्वज बैठक झाली आणि बीएसएफने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. ‘ध्वज बैठकीदरम्यान हिसकावलेले शस्त्र आणि रेडिओ सेट बीएसएफला परत देण्यात आले आहेत,’ असे सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा