त्रिपुरामध्ये १६ बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांना अटक !

अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश

त्रिपुरामध्ये १६ बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांना अटक !

त्रिपुरातील आगरतळा रेल्वे स्थानकावरून १६ मुस्लिम बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. या घुसखोरीमध्ये १३ पुरुष आणि ३ बांगलादेशी महिलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी तिघांची दलाल म्हणून ओळख पटली असून त्यांच्यावर बेकायदेशीर कामात सहभाग असल्याचा आरोप आहे.

आगरतळा सरकारी रेल्वे पोलिस स्टेशन (जीआरपीएस) येथे विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवारी १९ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपी बांगलादेशी आगरतळा रेल्वे स्थानकावरून भारतातील विविध शहरात जाण्यासाठी रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, सुत्रांकडून खबर मिळताच शासकीय रेल्वे पोलिसांनी त्यांना वेळीच पकडून त्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान, रेल्वे पोलीस त्यांची भारतातील ठिकाणे आणि दलाल यांचा तपास करत आहेत. अहवालानुसार, भारतातील विविध शहरांमध्ये घुसखोरीसाठी दलालांकडून नोकरी आणि बनावट सरकारी कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. गेल्या ३ महिन्यांत सरकारी रेल्वे पोलीस, सीमा सुरक्षा दल आणि इतर सुरक्षा पथकांनी २५० हून अधिक बांगलादेशी आणि सुमारे ४० रोहिंग्या मुस्लिमांना त्रिपुरात घुसखोरी करताना पकडले आहे.

हे ही वाचा :

कोलकाता: आरजी कार हॉस्पिटल परिसरात ‘कलम १६३’ लागू !

बांग्लादेशात हिंदूंच्या नोकऱ्यांवर डोळा, घरे-मंदिरावरील हल्ल्यानंतर जबरदस्तीने मागताहेत राजीनामे !

सत्तापालटानंतर बांगलादेश पुन्हा रुळावर, शाळा-महाविद्यालये उघडण्याचे आदेश !

विमानातून ज्वलनशील पदार्थ नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशासह पाच जणांना बेड्या

 

मिजानुर रहमान (२६), सफीकुल इस्लाम (३०), मो. आलमीन अली (२३), मो. मिलन (३८), सहबुल (३०), सरीफुल शेख (३०), कबीर शेख (३०), लिजा खातून (२६), तानिया खान (२४), अथी शेख (३९), वृंदाबन मंडल (२१), अब्दुल हकीम (२५), मो. इदुल (२७), मो. अब्दुर रहमान (२०), मो. अयूब अली (३०), और मो. जियारुल (२०), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Exit mobile version