मथुरेच्या वृंदावन येथील राहणाऱ्या तिहेरी तलाक पीडित महिलेने तिचे प्रेम मिळवण्यासाठी धर्माची भिंत तोडली आहे.तिने आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे.हिंदू मुलाशी लग्न करून रुबिनाची ‘प्रीती’ बनली आहे.बरेली येथील एका आश्रमात दोघांनी लग्नाच्या सात फेऱ्या घेतल्या आहेत.इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे प्रेमात अन नंतर दोघांचे लग्नात रूपांतर झाले आहे.
मुस्लिम महिला रुबीनाचे लग्न झाले होते.रुबिनाने सांगितले की, तिला ६ आणि ३ वर्षांची दोन मुले आहेत.तिचा नवरा तिला त्रास देत होता.६ महिन्यांपूर्वी तिच्या पतीने तिला तिहेरी तलाक देऊन घराबाहेर हाकलून दिल्याचे दिने सांगितले.यानंतर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून बदायूं येथील रहिवासी प्रमोद कश्यपच्या संपर्कात रुबिना आली.यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरु झाले आणि दोघांनी एक होण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा:
शिंदेंच्या बॅगांची तपासणी झाली आता ठाकरेंच्या फार्म हाऊसची होऊ द्या!
चिमुकल्या मोदी, योगींची हवा, पंतप्रधान मोदींनी भाषण थांबवले
केजरीवाल यांच्या गळ्याभोवती नवा फास आवळू लागला!
भारतीय वायूसेनेचे ‘भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल’ अवतरले!
मात्र, धर्माची भिंत आड येत होती.प्रमोद कश्यप याने सांगितले की, खूप विचार केल्यानंतर रुबीनाने हिंदू धर्म स्वीकारला आणि त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर आम्ही बुधवारी(१५ मे) बरेली येथील आश्रमात पोहोचलो.तिथे रुबीनाने विधीनुसार हिंदू धर्म स्वीकारला.यानंतर रुबीनाची प्रीती झाली.त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना पुष्पहार घालून सात फेरे घेतले.हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर प्रीतीने सांगितले, मला हिंदू धर्म आवडत असून सुरुवातीपासूनच हिंदू धर्मावर माझी श्रद्धा आहे.