लोकसभा निवडणुकीआधी सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गुरुवारी निवडणूक आयोगाशी संबंधित समितीचे सदस्य असणारे काँग्रेसनेते अधीररंजन चौधरी यांनी दिली. ज्ञानेश कुमार हे मूळ आग्रा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबातील अनेक जण डॉक्टर आहेत.
गेल्या काही वर्षांत ज्ञानेश कुमार यांचा महत्त्वाच्या निर्णयामध्ये सहभाग होता. मग ते काश्मीरमधून ३७० कलम हटवणे असो वा तीन तलाकवर निर्णय घेणे आणि राम मंदिराच्या निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणे असो, या सर्व बाबींत त्यांनी चोख भूमिका बजावली आहे.
ज्ञानेश कुमार गुप्ता यांचे वडील निवृत्ती सीएमओ असून ते सध्या एका शाळेचे संचालक आहेत. ज्ञानेशकुमार सुरुवातीपासूनच अभ्यासात हुषार होते. त्यांनी आयआयटी कानपूरमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी नागरी स्पर्धा परीक्षा दिली. त्यानंतर त्यांना केरळ कॅडर मिळाले आणि त्यांनी विविध पदे सांभाळली. त्यानंतर त्यांची केंद्र सरकारमध्ये नियुक्ती झाली.
हे ही वाचा:
‘भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांसाठी अमेरिकेच्या भूमीचा वापर’
निवडणूक रोख्यांत पैसे देणाऱ्यांत अदानी-अंबानींचा समावेश नाही
ममता बॅनर्जी जखमी, डोक्याला गंभीर दुखापत
राहुल गांधींनी विठ्ठलमूर्ती स्वीकारण्यास केली टाळाटाळ; व्हीडिओ व्हायरल
१९८८च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणारे ज्ञानेश कुमार कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला तेव्हा काश्मीरमध्ये मोठी जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी संसदीय कामकाज मंत्रालयाच्या सचिवपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. त्यानंतर त्यांची सहकार मंत्रालयाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. ३१ जानेवारी रोजी ते सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर लगेचच दीड महिन्यानंतर त्यांना निवडणूक आयुक्त म्हणून घटनात्मक जबाबदारी मिळाली आहे.