शाहजहान शेखचा शाळा सोडल्याचा दाखला बांगलादेशचा!

पद्मश्री प्राध्यापक नारायण चक्रवर्ती यांचा दावा

शाहजहान शेखचा शाळा सोडल्याचा दाखला बांगलादेशचा!

तृणमूलचा बलाढ्य नेता शाहजहान शेख याची मुळे बांगलादेशातील असल्याचे उघड झाले आहे. पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. नारायण चक्रवर्ती यांनी शाहजहान शेख याचा शाळा सोडल्याचा दाखला हा बांगलादेशातील असल्याचा दावा केला आहे.
पत्रकार अभिजित मुजुमदार यांनी हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यात शाहजहान हा कॉलेजच्या दिवसांत बांगलादेश नॅशनॅलिस्टपक्षाचा विद्यार्थी नेता होता, असे चक्रवर्ती सांगत असल्याचे दिसते आहे.

‘तो भारतात कधी आणि कसा घुसला आणि त्याने भारताचे नागरिकत्व कसे मिळवले, याचा शोध राष्ट्रीय तपास संस्थांनी घेतला पाहिजे,’ असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या मते, दोन मुख्य कारणांमुळे शेख शाहजहानसारख्या गुंडांना राजकीय पक्ष पाठीशी घालतात. प्रथम म्हणजे मतांवर प्रभाव पाडण्यासाठी, म्हणजे, एकतर नागरिकांना मते देण्यापासून परावृत्त करून किंवा केलेले मतदान रद्द करून मते मिळवली जातात.

दुसरे म्हणजे, त्यांच्याकडे अमर्यादित पैशांचा सतत पुरवठा आहे, याची खात्री केली जाते. हे राजकीय पक्ष केवळ विरोधी राजकीय पक्षांना विरोध करण्यासाठी अशी पावले उचलतात. ते विरोधी पक्षविरोधीपासून राष्ट्रद्रोही कसे होतात, हे त्यांचे त्यांनाही उमगत नाही. ते समजू शकत नाहीत की ते या जाळ्यात अडकत आहेत आणि त्यांचे स्वतःचे मंत्री या जाळ्यातून सुटू शकणार नाहीत, असेही चक्रवर्ती यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

इंटरनेटवर ‘व्हॉट्स राँग विथ इंडिया?’ ट्रेंड!

‘मिसाइल राणी’; अग्नि-५ क्षेपणास्त्रामागील डीआरडीओची ताकद!

मतदारांशी संपर्क साधण्यात राहुल गांधींकडून चूक

रशियाचे दिवंगत नेते नॅव्हल्नी यांच्या सहकाऱ्यावर हातोड्याने हल्ला

ट्रक चालक ते बांगलादेश सीमा भागाचा बेताज बादशाह
बांगलादेश सीमेकडील संदेशखाली भागातील प्रभावशाली नेता असणाऱ्या तृणूमूलच्या शाहजहान शेख याला बेताज बादशाह असे संबोधले जायचे. एका गरीब कुटुंबातील असूनही आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्याने हे स्थान मिळवले होते. दररोज अन्नाचे दोन घास तरी मिळावेत, यासाठी शाहजहान पडेल ती कामे करत असे. त्याने ट्रकचालक, कंडक्टरसह भाजी विक्रीचे कामही केले आहे.

तो सीपीआय नेते मोस्लीम शेख यांचा उजवा हात होता. तो त्यांच्यासाठी पैसे जमा करण्याचे काम करत असे. त्यानंतर त्याने मासेमारी आणि बांधकाम व्यवसायात नशीब आजमावले. सन २००४मध्ये संघटनेचा नेता म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर सन २००६मध्ये त्याने डाव्या पक्षात प्रवेश केला. मात्र सन २०१३मध्ये तृणमूल काँग्रेसची वाट धरली.

Exit mobile version