तृणमूलनेता पोलिसांच्या ताब्यात; आठवीच्या विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा आरोप

तृणमूलनेता पोलिसांच्या ताब्यात; आठवीच्या विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा आरोप

एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली पश्चिम बंगालच्या पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला ताब्यात घेतले आहे. या नेत्याने मुलीच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र ही मुलगी संधी साधून पळण्यात यशस्वी झाली. मात्र आपल्या मुलाला अडकवले जात आहे, असा आरोप या नेत्याच्या वडिलांनी केला आहे.

या प्रकरणी मुलीच्या आईने तक्रार नोंदवली आहे. शुक्रवारी रात्री २० वर्षीय आरोपी तृणमूल नेता गावातील या मुलीच्या घरात घुसला. ही मुलगी आठव्या इयत्तेत शिकते. तृणमूलच्या या नेत्याने तिचा विनयभंग केला. या दरम्यान मुलगी संधी साधून त्याच्या तावडीतून पळण्यात यशस्वी झाली आणि तिने मदतीसाठी हाका मारल्या. मुलीचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य आणि शेजारी बाहेर आले. मात्र लोकांनी येण्याआधीच तृणमूलनेता तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला, असे मुलीच्या आईने तक्रारीत नमूद केले आहे.

हेही वाचा :

अफगाणिस्तानमध्ये भीषण पाऊस, पुरात ६८ जणांचा मृत्यू

किर्गिझस्तानमधील भारतीय विद्यार्थ्यांना घरातच थांबण्याच्या सूचना

बुटांच्या व्यापाऱ्यांच्या घरात सापडले ४० कोटी!

पंतप्रधान मोदींच्या रॅलीत पोहोचले सिंगापूरचे उच्चायुक्त, रॅलीचे फोटो टाकत केले कौतुक!

तर, आरोपीच्या वडिलांच्या दाव्यानुसार, मुलीचे नातेवाईक भाजपशी संबंधित आहेत. तर, आम्ही तृणमूलचे कार्यकर्ते आहोत. मुलीकडच्यांकडून आमच्यावर भाजपमध्ये सहभागी होण्याचा दबाव वाढवण्यात आला. जेव्हा आम्ही त्याला नकार दिला तेव्हा त्यांनी हा घाणेरडा कट रचण्यात आला. माझ्या मुलाला याच कारणांमुळे अडवले जात आहे, असा आरोप आरोपीच्या वडिलांनी केला आहे.

Exit mobile version