आधी ग्रामस्थांकडून चपलेने मार, नंतर तृणमूलचा नेता पोलिसांच्या ताब्यात!

ग्रामस्थांची जमीन हडपल्याचा, खंडणीचा आरोप

आधी ग्रामस्थांकडून चपलेने मार, नंतर तृणमूलचा नेता पोलिसांच्या ताब्यात!

तृणमूल काँग्रेसचा (टीएमसी) नेता अजित मैती याला पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली आहे.टीएमसी नेता अजित मैती याच्यावर संदेशखाली येथील महिलांनी जमीन हडपल्याचा आणि खंडणीचा आरोप केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

संदेशखाली येथील महिलांनी जमीन बळकावल्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केल्यानंतर टीएमसीचा नेता शेख शाहजहान हा अद्याप फरार आहे.अटक करण्यात आलेला अजित मैती हा फरार शेख शाहजहान याचा सहकारी असून याच्यावर देखील जमीन हडपणे आणि खंडणीचा आरोप आहे.याबाबत पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ग्रामस्थांकडून जमीन हडपल्याच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही अजित मैती याला अटक केली आहे.तसेच फरार शाहजहान शेख विरोधात ७० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

ज्ञानवापीतील ‘व्यास तळघरा’मध्ये पूजा सुरूचं राहणार!

“आंदोलनस्थळी दगडफेक करण्याच्या सूचना जरांगेंकडूनचं”

रशिया-युक्रेन युद्धात सुरतच्या तरुणाचा मृत्यू

प्रखर राष्ट्रभक्त, हिंदुत्व विचारांचे पुरस्कर्ते, क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकरांना नमन

मिळालेल्या माहितीनुसार, अजित मैती हा शाहजहान शेखचा जवळचा सहकारी असल्याचे समजताच ग्रामस्थांनी त्याच्या घराची तोडफोड केली आणि त्याला चप्पलने मारहाण केली. यावेळी अजित मैती हा लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत होता.तो म्हणाला की, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मी कोणाची जमीन आणि पैसा काढून घेतला असेल तर त्यांनी माझी पोलिसांत तक्रार करावी.माझाकडून काही चुकी झाली असेल तर मी माफी मागतो.माझ्याविरुद्ध काही पुरावे सापडले तर मी ती जबादारी घेईन, असे अजित मैती जमावाला सांगण्याचा प्रयत्न करत होता.मात्र, जमाव ऐकण्याच्या परिस्थितीत न्हवता.त्यामुळे अजित मैती याने तेथून पळ काढत, दुसऱ्याच्या घरी आश्रय घेतला.

टीएमसी नेता अजित मैती हा सुमारे चार तास दुसऱ्याच्या घरात लपून बसला होता.या प्रकरणाची माहिती पोलिसांनी मिळताच घटनास्थळी दाखल झाले.ग्रामस्थांच्या आरोपावरून अजित मैतीला पश्चिम बंगाल पोलिसांनी काल ( २५ फेब्रुवारी ) अटक केली.

Exit mobile version