स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ‘इथे’ फडकला तिरंगा

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ‘इथे’ फडकला तिरंगा

भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली. पण असं एक ठिकाण होतं जिथं स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच तिरंगा फडकला आहे. जम्मू-काश्मीरमधील लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्ह हे ते ठिकाण आहे. या इमारतीवर देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे. सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रेस एन्क्लेव्हवर डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याचे फोटोही शेअर केले आहेत.

श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यावरुन अनेकदा वाद झाल्याचं आपण ऐकलं आणि वाचलं असेल. नरेंद्र  मुरली मनोहर जोशी यांनीही १९९२ मध्ये लाल चौकात तिरंगा फडकावण्यासाठी तिरंगा यात्रा काढली होती. ही परिस्थितीत अनेक वर्षे कायम होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर तिथली परिस्थिती हळूहळू बदलत असल्याचं पाहायला मिळतंय. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया कमी होत असल्याचे दिसत आहे. अशावेळी लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्ह इमारतीवर तिरंगा फडकल्यानं देशप्रेमी नागरिकांकडून आनंदाची भावना व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

…अन्यथा उद्रेक होईल- देवेंद्र फडणवीस

नक्षलवाद्यांनी जवानाला बंदी बनवले

शरद पवारांनी घेतला लसीचा दुसरा डोस

लेहमध्ये बदलापूरच्या जवानाला हौतात्म्य

यापूर्वी सर्वात आधी लाल चौकात तिरंगा फडकवण्याचं काम १९९२ मध्ये भाजपाचे नेते मुरली मनोहर जोशी यांनी केलं होतं. मुरली मनोहर जोशी यांनी ११९१ मध्ये कन्याकुमारी ते श्रीनगर अशी एकता यात्रा काढली होती. या यात्रेचा समारोप २६ जानेवारी १९९२ म्हणजे प्रजासत्ताक दिनी लाल चौकात तिरंगा फडकावून करण्यात आला. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो वेगळा होऊ देणार नाही, असा संदेश एकता यात्रेतून देण्यात आला होता.

Exit mobile version