बर्फाच्छादित शिखरावर जवानांनी फडकावला तिरंगा

बर्फाच्छादित शिखरावर जवानांनी फडकावला तिरंगा

देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात देशाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जात आहे. सीमा भागातील जवानांनीही मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला. या जवानांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

गोठवणाऱ्या थंडीत बर्फवृष्टीत सीमेवरील जवानांनी देशाचा तिरंगा फडकवला. उत्तराखंडमधील जोशीमठ भागातल्या बर्फाच्छादित शिखरात समुद्रसपाटीपासून १४ हजार फूट उंचीवर उणे ३० (-३०) तापमानात आयटीबीपीच्या जवांनांनी ध्वजवंदन केले. तसेच यावेळी जवानांच्या तुकडीने ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. गुडघ्यापर्यंत साचलेल्या बर्फात हे जवान उभे असून जोरदार बर्फवृष्टी होत असताना दिसत आहे. यावेळीही या जवानांचा जोश कुठेही कमी झालेला नाही.

हे ही वाचा:

उत्तर भारतीय संघाच्या अध्यक्षपदी संतोष आर एन सिंह

‘किरीट सोमय्यांना कोणत्या अधिकाराने नोटीस पाठवली आहे?’

राज्यातील महाविद्यालये या तारखेपासून होणार सुरू

प्रजासत्ताक दिनाच्या गुगलकडून भारतीयांना खास शुभेच्छा

यंदा प्रजासत्ताक दिन आठवडाभर साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. २३ जानेवारीपासून प्रजासत्ताक दिन सोहळा सुरू झाला आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील इंडिया गेट येथे महान स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले होते.

Exit mobile version