पंतप्रधान मोदी यांच्याकडून महात्मा गांधी यांना श्रद्धांजली

पंतप्रधान मोदी यांच्याकडून महात्मा गांधी यांना श्रद्धांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५४व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राजघाटावर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘बापूंची कालातीत शिकवण प्रत्येकाचा मार्ग उजळून टाकत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी या महात्म्याचा गौरव केला.

‘गांधी जयंतीनिमित्त मी महात्मा गांधींना नमन करतो. त्यांची कालातीत शिकवण आमचा मार्ग उजळून टाकत आहे. महात्मा गांधींचा प्रभाव जागतिक आहे. त्यांची शिकवण संपूर्ण मानवजातीला एकता आणि करुणेची भावना पुढे नेण्यासाठी प्रेरित करते. त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहूया. सर्वत्र एकता आणि सौहार्द वाढवणारे त्यांचे विचार प्रत्येक तरुणाने आत्मसात करावेत,’ असे ट्वीट पंतप्रधान मोदींनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवारी सकाळी साडेसात वाजता राजघाटावर आगमन झाले. यावेळी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेदेखील उपस्थित होते. या सर्वांनीही राजघाटावरील महात्मा गांधी यांच्या समाधीवर फुले वाहून श्रद्धांजली व्यक्त केली.

हे ही वाचा:

स्केटिंग रिलेमध्ये भारताची दोन कांस्य पदकांची कमाई

ते जर्मनीच्या अध्यक्षांचे निवासस्थान, बोर्डिंग स्कूल नव्हे!

अविनाश साबळेची सोनेरी धाव!

तजिंदरपालसिंगने केली सुवर्णविजेती गोळाफेक!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार, रविवारी देशभरात स्वच्छता मोहीम राबवली गेली. मोदी यांनी ‘मन की बात’ या त्यांच्या रेडिओ कार्यक्रमात स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन केले होते. १ ऑक्टोबरला सर्वांनी एक तास श्रमदान करून स्वच्छतामोहीम राबवावी. ही महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना ‘स्वच्छतांजली’ असेल, असे आवाहन त्यांनी देशातील सर्व नागरिकांना केले होते. त्याला देशभरातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Exit mobile version