पद मग ते कितीही माेठे असाे पण अंगी विनयशीलता असेल तर त्याची छाप समाेरच्या व्यक्ती समाेर पडायला काही वेगळे काही करावे लागत नाही. भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती पद भुषवणारे डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबाबतीत नेमके हेच म्हणता येईल. ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्म दिवस. या निमित्ताने त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या प्रसंगांचा उल्लेख ही त्यांना खरी आदरांजली ठरेल.
डॉ. राधाकृष्णन एकदा ते भारतीय तत्त्वज्ञानावर व्याख्यान देण्यासाठी इंग्लंडला गेले होते, तेव्हा त्यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. त्यावेळी एका इंग्रजाने त्यांना विचारले हिंदू नावाचा कोणी समाज आहे का? हिंदू, संस्कृती आहे का? तुम्ही किती विखुरलेले आहात? तुमचा रंग एकच नाही, कुणी पांढरा, कुणी काळा, कुणी धोतर, कुणी लुंगी, कुणी कुर्ता, कुणी शर्ट, बघा, आपण सगळे इंग्रज एकच आहोत- एकच रंग आणि एकच पोशाख हे ऐकून राधाकृष्णन यांनी लगेच त्या इंग्रजाला उत्तर दिले. दिली- घोडे वेगवेगळ्या रंगाचे असतात, पण गायी एकसारख्याच असतात. विविध रंग आणि विविधता हे विकासाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या या तर्कशुद्ध उत्तराने सारे सभागृह गप्प तर झालेच पण त्यांचे उत्तर सर्वांना मनाेमन पटले.
सर्वपल्ली राधाकृष्णन चीनला गेले हाेते तेंव्हाची ही गाेष्ट. चीनचे नेते माओ यांनी डाॅ, सर्वपल्ली राधाकृष्णन यांना ममपल्या निवासस्थानी पाहुणचारासाठी पाचारण केले हाेते. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं तेव्हा राधाकृष्णन यांनी माओ यांचे गाल प्रेमाने थोपटले. त्यांच्या या कृतीचं माओना आश्चर्य वाटलं यावर माओ काही बोलायच्या आधीच राधाकृष्णन म्हणाले, “अध्यक्ष महोदय. तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका, असंच मी स्टॅलिन आणि पोप यांच्याबरोबरसुद्धा केल आहे.” भारताचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यादरम्यान चीनमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी बीबीसीचे प्रतिनिधी रेहान फजल यांना त्या भेटीबद्दल सांगितलं, “जेवण करताना माओ यांनी चॉपस्टिकच्या साहाय्यानं प्लेटमधील एक पदार्थ राधाकृष्णन यांच्या ताटात ठेवला. पण, राधाकृष्णन हे शाकाहारी आहेत, याचा माओ यांना काही एक अंदाज नव्हता. राधाकृष्णन यांनीही माओ यांनी काही चूक केली, असं जाणवू दिलं नाही.” त्यावेळी राधाकृष्णन यांच्या बोटाला जखम झालेली होती. चीनच्या दौऱ्यापूर्वी कंबोडियाला गेले असताना कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे त्यांचा हात कारच्या दरवाजामध्ये अडकला होता आणि बोटाचं हाड मोडल होतं. माओ यांनी हे बघितल्यानंतर डॉक्टरांना बोलावलं आणि राधाकृष्णन यांच्या बोटाची मलमपट्टी करून दिली.
डॉ राधाकृष्णन १९३८ मध्ये गांधीजींना भेटण्यासाठी सेवाग्रामला गेले होते. त्यावेळी गांधीजी देशवासीयांना भुईमूग खाण्याचा आग्रह करत होते. बापू लोकांना दूध पिण्यास मनाई करायचे. दूध हे गाईच्या मांसाचे अतिरिक्त उत्पादन आहे असा त्यांचा विश्वास होता.जेव्हा डॉ.राधाकृष्णन गांधीजींना भेटायला आले तेव्हा गांधीजींनी त्यांनाही या गोष्टी सांगितल्या. तेव्हा डॉ. राधाकृष्णन यांनी उत्तर दिले- मग आपण आईचे दूधही प्यायला नकाे.
हे ही वाचा:
शहेनशाह जहाँ बैठते है, दरबार वही लग जाते है…
पोलीसाच्या मित्रानेच सोनाराला लुटले…
‘केरळमध्ये काम करण्यासाठी देशभक्तीबरोबरच बलिदान आणि शौर्यही हवे’
‘शबाना, नसीरुद्दीन स्लीपर सेल एजंट’
उपराष्ट्रपती असताना ते राज्यसभा सांभाळत होते, अशी माहिती आहे. मग सभेत कुठलाही गोंगाट किंवा इतर काही कामे झाली तर ते सभेतच संस्कृत आणि बायबलचे श्लोक वाचून दाखवायचे. इतकेच नाही तर ते देशाचे पहिले नागरिक म्हणजेच राष्ट्रपती असताना त्यांच्या पगाराच्या २५,००० रुपयांपैकी फक्त १०,००० रुपये घेत असत आणि उरलेली रक्कम पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत व्यवस्थापन निधीला दान केली जात असे. इतक्या साध्या आणि विनयशील वर्तनातूनही डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे किती माेठे व्यक्तीमत्व हाेतं हे समजून येतं.