27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषअटल.. अचल.. अविचल.. अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडून आदरांजली

अटल.. अचल.. अविचल.. अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडून आदरांजली

एक्सवर पोस्ट करत लिहिला खास संदेश

Google News Follow

Related

भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची २५ डिसेंबर रोजी जयंती असते. त्यानिमित्ताने प्रत्येक वर्षी भारतात ‘गुड गवर्नेंस डे’ म्हणजेच सुशासन दिन साजरा केला जातो. अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती निमित्ताने हा दिन साजरा करण्यात येतो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असे व्यक्तिमत्व होते. त्यांनी भारताचे नाव अनेक क्षेत्रात मोठे केले.

अटल बिहारी वाजपेयी यांना देशभरातून आदरांजली अर्पण करण्यात येत असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण केली आहे. नरेंद्र मोदींनी एक व्हिडीओ ट्विट करत त्यांचा परिचय करून दिला आहे. “भारतमातेचे लाडके अटल यांचे संपूर्ण जीवन हे राष्ट्राला समर्पित होते. प्रत्येक क्षण ते राष्ट्रासाठी जगले आणि केवळ राष्ट्राचाचं विचार त्यांनी केला. सत्तेपासून दूर राहूनही जनतेची सेवा करत राहणं, आदर्श- विचार यांच्याशी कधीही तडजोड न करणं, लक्ष्याच्या दिशेने जात राहणं हे अटल यांच्या जीवनात पाहिले आहे,” अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

तसेच त्यांनी लिहिले आहे की, “देशाच्या सर्व कुटुंबीयांच्या वतीने मी माजी पंतप्रधान आदरणीय अटलबिहारी वाजपेयी जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. ते आयुष्यभर राष्ट्र उभारणीला गती देण्यात मग्न राहिले. भारत मातेसाठी त्यांचे समर्पण आणि सेवा त्यांच्या अमर काळातही प्रेरणास्थान राहील.”

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की, “अटल यांनी देश आणि समाजाची निस्वार्थीपणे सेवा केली आणि भाजपाच्या स्थापनेद्वारे देशातील राष्ट्रवादी राजकारणाला नवी दिशा दिली. एकीकडे त्यांनी अणुचाचणी आणि कारगिल युद्धाच्या माध्यमातून उदयोन्मुख भारताच्या सामर्थ्याची जाणीव जगाला करून दिली, तर दुसरीकडे त्यांनी देशात सुशासनाचे व्हिजन अंमलात आणले. त्यांचे अमूल्य योगदान देश सदैव स्मरणात ठेवेल.”

हे ही वाचा:

बारामतीतील प्रकल्पासाठी २५ कोटी देणाऱ्या अदानींचे पवारांकडून कौतुक

कृषीमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण!

भाषण देत असतानाच आयआयटी कानपूरचा प्राध्यापक कोसळला

राम लल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी सीताराम येचुरी उपस्थित राहणार नाहीत

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ साली मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये झाला. ते तीन वेळा भारताचे पंतप्रधान राहिले आहेत. १९९६ साली पहिल्यांदा तर १९९८-९९ मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तर, १३ ऑक्टोबर १९९९ साली तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले. २७ मार्च २०१५ ला त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा