‘हर घर तिरंगा’मुळे आदिवासी महिलांना खुले होणार रोजगाराचे द्वार

हर घर तिरंगा अंतर्गत गुजरातच्या आदिवासी महिलाना नवा रोजगार उपलब्ध

‘हर घर तिरंगा’मुळे आदिवासी महिलांना खुले होणार रोजगाराचे द्वार

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होतील. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्र सरकारने दणक्यात साजरा करण्याचे योजिले आहे. त्यासाठी केंद्राने ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवला आहे. त्यासाठी विविध यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. केंद्राच्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमामुळे गुजरातच्या तापी जिल्ह्यातील आदिवासी पाड्यातील महिला बचत गटांना नवा रोजगार मिळाला आहे.

राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका (एनआरएलएम) या मोहिमेअंतर्गत या बचत गटांना काम देण्यात आले असून, राष्ट्रध्वजासाठी बाबूच्या काठ्या बनवून देण्याचे काम या आदिवासी महिला बचत गटांना देण्यात आले आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या ५० हजार बाबूंच्या काठ्या तयार केल्या जाणार असून त्यांचे ९ जिल्ह्यात वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती तापी जिल्ह्यांतील विकास अधिकारी दिनेश कपाडिया यांनी सांगितले.

हे ही वाचा:

म्हाडा, आरोग्य भरती आणि टीईटी, या प्रकरणांचा तपास ईडीकडे

महिला रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडली; आरोपीला जामीन नाकारला

मदरशातील शिक्षकांना कंटाळून ५ मुले बिहारला पळाली

युद्धनौका निघाल्या विश्व सफारीवर

तापी जिल्ह्यातील व्यारा तालुक्यामध्ये असलेल्या ८ आदिवासी खेड्याना केंद्र सरकारच्या या मोहीमामध्ये थेट सहभागी करून घेण्याची संधी मिळाली. ‘सखी मंदाली’ या बचत गटातर्फे या ध्वजांसाठी काठ्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रथम अधिकाऱ्यांनी या गावात आदिवासी महिला बचत गटाला या उपक्रमाबद्दल सांगितले असता, त्यांनी त्याचा आनंदाने स्वीकार केला. बचत गटाशी निगडित असलेल्या महिलांनी ५ लाखापेक्षा जास्त बाबूंच्या काठ्या बनवण्याचा संकल्प केला आहे. अशी माहिती कपाडिया यांनी दिली.

Exit mobile version