31 C
Mumbai
Sunday, November 3, 2024
घरविशेषलहान मुलांवरही कोवॅक्सिनची चाचणी

लहान मुलांवरही कोवॅक्सिनची चाचणी

Google News Follow

Related

भारताच्या कोविड विरूद्धच्या लसीकरणातील मुख्य लसींपैकी एक भारत बायोटेकच्या लसीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) लहान मुलांमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे या लसीची वय वर्ष २ ते १८ या वयोगटातील लहान मुलांवर चाचणी केली जाणार आहे.

देशात लसीकरणाचा परिघ वाढवून १८ वर्षांवरील सर्वांपर्यंत आणण्यात आला आहे. परंतु देशातील अनेक लहान मुलांना कोविडची बाधा होत असल्याचे समोर येत आहे. त्यांना देखील लस मिळावी यासाठी सुमारे ५२५ सशक्त मुलांना SARS-CoV-2 वरील लस देऊन तिची चाचणी करण्यात येणार आहे. सुमारे २८ दिवसांच्या अंतरतातील दोन डोसची चाचणी या लहान मुलांवर केली जाणार आहे.

हे ही वाचा:

मुंबई मॉडेल इतकेच यशस्वी होते तर लॉकडाऊन का वाढवला?

‘सोशल’ दबावामुळे अखेर ‘सोशल’ उधळपट्टीचा निर्णय रद्द

भाजपाच्या प्रभावाने करदात्यांचे कोट्यवधी रुपये वाचले

कोविडमुळे युपीएससीच्या परिक्षाही पुढे ढकलल्या

कोवॅक्सिन ही कोविड-१९ वरील जगातील लहान मुलांवर तपासली जाणारी पहिली लस असली तरी त्यांच्या चाचण्यांना सप्टेंबर २०२० सुरूवात झाली होती. या चाचण्या अगदी १२ वर्ष वयाच्या लहान मुलांपर्यंत केल्या गेल्या होत्या. त्यावेळी दुसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये ३८० लहान मुलांनी सहभाग घेतला होता. सध्या ही लस आपात्कालिन वापरासाठी १८ वर्षे वयावरील वरच्या सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे.

जानेवारी महिन्यात भारत बायोटेकचे संचालक डॉ. कृष्ण इला यांनी सांगितले होते, की  कंपनीची लहान मुलांवर या लसीची चाचणी घेण्याची इच्छा आहे. या लसीमध्ये मृत विषाणु वापरला जातो, जे तंत्रज्ञान रेबिज आणि पोलिओ सारख्या इतर अनेक लसींमध्येदेखील वापरले जाते.

आता या लसीच्या लहान मुलांवरील दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला डीजीसीआयकडून परवानगी मिळाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा