23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषमेट्रोची चाचणी मे महिन्याच्या अखेरीस

मेट्रोची चाचणी मे महिन्याच्या अखेरीस

Google News Follow

Related

मुंबईकरांसाठी बहुप्रतिक्षेत असलेल्या मेट्रोची पहिली चाचणी मे महिन्याच्या अखेरीस होणार आहे. चारकोप कामराज ते आरे या मार्गावर आणि दहिसर ते चारकोप या मार्गावर मेट्रोची चाचणी होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरूवातील चारकोप ते आरे या मार्गिका क्र. २अ आणि मार्गिका क्र. ७ या मार्गिकांवरील २० किमीच्या टप्प्यात ही चाचणी घेण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये मेट्रो १ या वर्सोवा- घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या मेट्रो मार्गाच्या यशानंतर विविध मार्गिका आखण्यात आल्या होत्या. त्यापैकी मेट्रो मार्गिका क्र. २अ ही दहिसर पूर्व ते डी एन नगर, अंधेरी पश्चिम या दरम्यान धावणार आहे, तर मेट्रो मार्गिका क्र. ७ दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व अशी धावणारी आहे. या मार्गिकांवरील गाड्यांची चाचणी फेरी मे महिन्याच्या अखेरीस होणार आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्र मॉडेल अनुसरा, पीआर आणि सोशल मीडियासाठी पैसे उधळा

इस्राएलविरुद्ध इस्लामिक राष्ट्र आक्रमक, ‘ही’ कारवाई करणार

पंतप्रधान जिल्हाधिकाऱ्यांना देणार कानमंत्र

मुंबई महानगरपालिकेकडून लसींसाठी ग्लोबल टेंडर

एमएमआरडीएचे आयुक्त आर ए राजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महामारीमुळे मेट्रोची अनेक कामे रखडली. अनेक अडचणी येऊनसुद्धा एमएमआरडीए वेळापत्रक पाळण्यासाठी कसून प्रयत्न करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मेट्रोची २० किमी टप्प्यातील चाचणी मे महिन्याच्या अखेरीस घेतली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे मेट्रोच स्वप्न लवकरच साकार होईल.

यावरून काही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवायला सुरूवात केली आहे. मेट्रोच्या मार्गिकेवर अनेक ठिकाणी अजून गर्डरही चढलेले नाहीत. ही परिस्थिती असताना मेट्रो काय हवेतून जाणार का? असा सवाल करत काही नेटकऱ्यांनी या चाचणीची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान १९ जानेवारी २०२१ रोजी टाईम्स ऑफ इंडियाला प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार मुंबई मेट्रो २ अ आणि ७ (ज्यांच्यावर आत्ता चाचणी होणार आहे) या मार्गिका खरंतर मुंबईकरांच्या सेवेतच दाखल होणार होत्या. ठाकरे सरकारमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मे २०२१ मध्ये मुंबईकरांच्या सेवेत दहिसर ते अंधेरी दरम्यान धावणाऱ्या २अ आणि ७ या दोन्ही मार्गिका कार्यान्वित होतील असे सांगितले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या इतर सर्व दाव्यांप्रमाणेच हा दावा देखील फोल ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा