नगरच्या गिर्यारोहकांचा नाशिक मध्ये मृत्यू

नगरच्या गिर्यारोहकांचा नाशिक मध्ये मृत्यू

गिर्यारोहणाची मोहीम संपता संपता कड्यावरून कोसळून अहमदनगरच्या २ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये ही घटना घडली असून मनमाड येथील हडबीची शेंडी या डोंगरावरून हे दोन तरुण गिर्यारोहक खाली पडले आणि त्यांचे निधन झाले. गिर्यारोहणाची मोहीम पूर्ण करून खाली उतरत असतानाच त्यांच्यासोबत हा अपघात घडला आहे. ज्यात या दोन्ही गिर्यारोहकांचा मृत्यू झाला असून एक गिर्यारोहक गंभीर जखमी झाला आहे.

हे गिर्यारोहक अहमदनगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य होते. या ग्रुपतर्फे मनमाड येथील हडबीची शेंडी या डोंगरावर गिर्यारोहणाची मोहीम आखली होती. अंगठ्या डोंगर या नावानेही हा डोंगर प्रसिद्ध आहे. एकूण पंधरा जणांचा हा समूह होता. एकूण आठ दिवसांची गिर्यारोहण मोहीम असून बुधवार २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ही मोहीम संपून गिर्यरोहकांचा चमू खाली उतरत असतानाच हा अपघात झाला.

हे ही वाचा:

अनिल देशमुख म्हणाले की, पोलिसांच्या पोस्टिंगची यादी अनिल परब देत असत!

U19 WC: भारताचे निर्विवाद ‘यश’! ऑस्ट्रेलियाला ‘धुल’ चारत अंतिम फेरीत धडक

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

उज्ज्वल निकम म्हणतात, नितेश राणे प्रकरणाचा निष्कारण फुगा केला गेला!

चमूतील सर्व गिर्यारोहक दोरखंडाच्या आधारे खाली उतरल्यानंतर दोरखंड सोडत असतानाच मयूर दत्तात्रय म्हस्के (२४) आणि अनिल शिवाजी वाघ (३४) हे दोघेही कड्यावरून खाली कोसळले खाली कोसळल्यानंतर या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर यांच्यासोबत प्रशांत पवार हा गिर्यारोहकही गंभीररित्या जखमी झाला आहे.

मयूर आणि अनिल हे दोघेही निष्णात गिर्यारोहक असून ते एकमेकांचे नातेवाईक होते. ते मामा भाचे होते. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा धोकादायक गिर्यारोहक मोहीमा चर्चेत आल्या आहेत. मनमाड जवळचा अंगठ्या डोंगर हा अशाच प्रकारचा महाराष्ट्रातील एक कठीण असा सुळका मानला जातो. त्यामुळे अशा मोहिमा करताना गिर्यारोहकांनी शक्य ती सर्व सुरक्षेची खबरदारी घेण्यात यावी अशा चर्चा रंगताना दिसत आहेत.

Exit mobile version