शतक झळकावल्यानंतर ट्रॅव्हिस हेडचे ‘नो सेलिब्रेशन’

शतक झळकावल्यानंतर ट्रॅव्हिस हेडचे ‘नो सेलिब्रेशन’

ट्रेव्हिस हेड आयपीएलच्या चालू हंगामात आपल्या वादळी फलंदाजीमुळे चर्चेत आहे. त्याने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ३२ चेंडूत ८९ धावांची आक्रमक दे दणादण खेळी करत क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. पण त्याआधी त्याच मोसमात आरसीबीविरुद्ध ३९ चेंडूत शतक झळकावत त्याने इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील चौथे वेगवान शतक झळकावले. त्यानंतर त्याने बॅट हेल्मेट घालून अनोख्या पद्धतीने शतकी खेळी साजरी केली. अनेकांच्या मनात प्रश्न होता की, हे कोणते सेलिब्रेशन आहे?

ट्रॅव्हिस हेडला याबाबत विचारणा केली. एकीकडे अनेक फलंदाज अनोख्या पद्धतीने शतकी खेळी साजरे करतात, पण त्यांच्या शांततेचे कारण काय? यावर हेड म्हणाले की, काही वर्षांपूर्वी त्याचा एक जिवलग मित्र फिलिप ह्युजेस याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ट्रॅव्हिस हेड जेव्हा जेव्हा बॅटने शतक झळकावतो तेव्हा तो फिलिप ह्युजेसचा शहिदासारखा सन्मान करतो. २०१९ साली ट्रॅव्हिस हेडने श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात पहिले शतक झळकावले होते. त्याने ही शतकी खेळी फिलिप ह्युजेसला समर्पित केली.

हेही वाचा :

पाकिस्तानला झटका; आझम खान टी-२० मालिकेतून बाहेर

शिवम दुबेची पत्नी अंजुम खान ‘धोनीची फॅन’

हैदराबादची ‘मालवाहतूक ट्रेन’ सुसाट; दिल्लीला पराभूत करून दुसऱ्या क्रमांकावर झेप

कर्नाटकमध्ये भाजप नेत्याच्या मुलासह चौघांची हत्या

फिलिप ह्युजेसचा मृत्यू कधी झाला?
२५ नोव्हेंबर २०१४ रोजी ऑस्ट्रेलियाच्या शेफिल्ड शिल्ड देशांतर्गत स्पर्धेत फिलिप ह्युजेस दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळत होता आणि त्याचा सामना न्यू साऊथ वेल्सविरुद्ध होता. ह्युज १६१ चेंडूत ६३ धावांवर खेळत होता. पण शॉन अॅबॉटने टाकलेला बाऊन्सर बॉल त्याच्या हेल्मेटवर आदळला. ह्युजेस उभा राहून जमिनीवर कोसळला आणि रुग्णालयात तपासणी सुरू असताना २७ नोव्हेंबर २०१४ रोजी त्याचा मृत्यू झाला.

Exit mobile version