30 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषशतकवीर हेड आणि स्मिथची अडीचशे धावांची भागीदारी

शतकवीर हेड आणि स्मिथची अडीचशे धावांची भागीदारी

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी ३ बाद ३२७ धावसंख्येपर्यंत मारली मजल

Google News Follow

Related

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाने गाजवला. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्राव्हिस हेडने शतकी खेळी करून आपल्या संघाला ३ बाद ३२७ अशा सुस्थितीत नेले. शिवाय, हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी चौथ्या विकेटसाठी २५१ धावांची अभेद्य भागीदारी केली. हेडने नाबाद १४६ धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथला शतकासाठी आणखी पाच धावांची गरज आहे. त्याच्या ९५ धावा झालेल्या आहेत.

भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताचा कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय योग्य ठरू लागला. पहिल्या ७६ धावांतच ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज माघारी परतले. मात्र त्यानंतर स्मिथ आणि हेड यांनी चिवट खेळी करत अडीचशे धावा जोडल्या.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हेड म्हणाला की, नाणेफेक हरलो असलो तरी पहिल्या दिवशी आम्ही चांगली कामगिरी केली. सकाळी खूप मेहनत घ्यावी लागली. पण एक चांगली सुरुवात झाली आहे. भारताच्या मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी उसळत्या चेंडूंचा मारा केल्यामुळे हेडला शतक करण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागली.

हेड म्हणाला की, मी सध्या अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. पण माझी खूप परीक्षा पाहिली गेली. काही वेळा वाटले की भारतीय संघाने आपल्यासाठी काही व्यूहरचना केली आहे की, काय असेही वाटून गेले. पण मी परिस्थितीशी जुळवून घेतले, मेहनत घेतली, त्या कठीण काळात तग धरली आणि त्याचवेळेला संयमही राखला.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींनी शिक्षण घेतलेली शाळा बनणार ‘प्रेरणा स्थळ’

लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन

पु. ल. स्मृतीदिनानिमित्त रसिकांसाठी पर्वणी!

बंगालमधील कोरोमंडल अपघातग्रस्तांना दोन हजारांच्या चलनी नोटांमध्ये मदत

 

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही दुसऱ्या टोकाने किल्ला लढविला. २२७ चेंडूंत त्याने ९५ धावांची नाबाद खेळी केली. हेड म्हणतो की, मला स्टीव्ह सोबत फलंदाजी करायला खूप आवडते. कारण तो सोबत असताना प्रतिस्पर्धी गोलंदाज त्याच्याविरुद्ध योजना आखत असतात तेव्हा मला मोकळेपणाने फलंदाजी करता येते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा