नागपूर -पुणे प्रवास करणाऱ्यांना नितीन गडकरींनी दिली खूशखबर

नवीन प्रस्तावित कनेक्टिव्हिटीमुळे वेळ कमी लागेल.

नागपूर -पुणे प्रवास करणाऱ्यांना नितीन गडकरींनी दिली खूशखबर

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांबाबत मोठी घोषणा केली आहे. गडकरी म्हणाले की, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग नव्याने प्रस्तावित पुणे औरंगाबाद एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्स्प्रेस वेशी जोडला जाईल, जो नागपूर ते पुणे अंतर अवघ्या आठ तासांत पूर्ण करेल. सध्या नागपूरहून पुण्याला पोहोचण्यासाठी १४ तास लागतात. अशा परिस्थितीत, नवीन प्रस्तावित कनेक्टिव्हिटीमुळे सुमारे ६ तासांचा वेळ कमी होईल.

गडकरी म्हणाले की, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग नव्याने प्रस्तावित पुणे औरंगाबाद ऍक्सेस कंट्रोल ग्रीन एक्स्प्रेस वेशी जोडला जाईल, ज्यामुळे नागपूर ते पुणे अंतर आठ तासांत पूर्ण करण्यात मदत होईल. सध्या नागपूरहून पुण्याला पोहोचण्यासाठी १४ तास लागतात. अशा परिस्थितीत, नवीन प्रस्तावित कनेक्टिव्हिटीमुळे सुमारे ६ तासांचा वेळ कमी होईल.
ट्विटमध्ये गडकरींनी ही घोषणा करताना लिहिले की, ‘नागपूर ते पुणे आठ तासांत प्रवास करणे शक्य होणार आहे.

सध्या नागपूर ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग छत्रपती संभाजीनगर ‘औरंगाबाद’ जवळील नवीन प्रस्तावित पुणे-छत्रपती संभाजीनगर ‘औरंगाबाद’ ऍक्सेस कंट्रोल ग्रीन एक्स्प्रेस वेशी जोडला जाईल. ते पुढे म्हणाले की, एनएचएआयद्वारे रस्ता पूर्णपणे नवीन संरेखित करून बांधला जाईल.

समृद्धी महामार्गतर्फे पुणे ते छत्रपती संभाजीनगर ‘औरंगाबाद’ हा अडीच तासात आणि नागपूर ते छत्रपती संभाजीनगर ‘औरंगाबाद’ असा साडेपाच तासात प्रवास करणे शक्य होणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रगती का हायवे हॅशटॅगसह ट्विट केले आहे.

Exit mobile version