मुंबई पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे उपगनगरिय मार्गावर येत्या काही वर्षात १५ डब्यांच्या वातानुकूलित रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहेत. सध्या १२ डब्यांची वातानुकूलित लोकल सेवा चालू आहेत. भविष्यात १५ डब्यांची वातानुकूलित लोकल चालवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून त्यासंबंधित तांत्रिक तपशील रेल्वे बोर्डा कडे सादर केले आहेत. त्यामुळे येत्या काळात १५ डब्यांच्या लोकलही वातानुकूलित असतील तर ठंडा ठंडा कूल कूलचा अनुभव सगळेच प्रवासी घेऊ शकणार आहेत.
सध्या चालवल्या जाणाऱ्या वातानुकूलित लोकलची रचना ही सामान्य लोकलप्रमाणेच असून, या लोकलची रचना १२ डब्यांच्या वातानुकूलित लोकल प्रमाणेच आहे. सध्या रेल्वेमध्ये १५ डब्यांची विना वातानूकुलित लोकल असून प्रवाशांची ने-आण करत आहेत. पश्चिम रेल्वेवर जलद आणि धीम्या मार्गावर दररोज १५ डब्यांच्या एकूण ७९ फेऱ्या होत आहेत. येत्या काही महिन्यात १५ डब्यांच्या विना वातानुकूलित लोकलच्या २७ फेऱ्या वाढविण्याच्या निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच मध्य रेल्वे वरील विना वातानुकूलित लोकलच्या दररोज २२ फेऱ्या होत आहेत. फेऱ्या वाढीबाबत मध्य रेल्वे कडून अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये.
हे ही वाचा:
संजय राऊत यांची कोठडी ४ दिवस वाढली
टोलसंबंधी नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा
उदय सामंत हल्ल्याप्रकरणी शहर प्रमुख संजय मोरेंसह पाच जणांना अटक
राष्ट्रकुल स्पर्धेत आणखी दोन सुवर्णपदकांवर भारताची मोहोर
विना वातानुकूलित १५ डब्यांच्या लोकल सेवेत असल्याने भविष्यात १५ डब्यांची वातानुकूलित रेल्वे चालवणे शक्य आहे. यासाठी कोणतीच तांत्रिक अडचण येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तांत्रिक तपशिलासह अहवाल रेल्वे मंडळाला दिला असून, या संदर्भात रेल्वे मंडळाकडून अंतिम निर्णय होईल.