पाटणामधील सिव्हील कोर्टात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

पाटणामधील सिव्हील कोर्टात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

बिहारची राजधानी पटणा येथील एका न्यायालयात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. पाटणा येथील सिव्हील कोर्टात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

बिहारची राजधानी पाटणा येथील सिव्हील न्यायालयात ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट झाला. यावेळी ट्रान्सफॉर्मरजवळ उभे असलेले तीन वकील गंभीर भाजले. दरम्यान, एका वकिलाचा घटनास्थळी मृत्यू देखील झाला आहे. ट्रान्सफॉर्मरमधीन तेल लीक होत असल्यामुळे अचानक आग लागली, अशी माहिती समोर आली आहे. दोन जखमी वकिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हील न्यायालयाचे नोटरी देवेंद्र प्रसाद अशी मृत व्यक्तीची ओळख असल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा:

संसद घुसखोर प्रकरण; भाजपचे खासदार प्रताप सिम्हा तिकिटाच्या प्रतीक्षेत!

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएकडून एक संशयित ताब्यात

शाहजहान शेखचा शाळा सोडल्याचा दाखला बांगलादेशचा!

इंटरनेटवर ‘व्हॉट्स राँग विथ इंडिया?’ ट्रेंड!

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. दरम्यान या स्फोटानंतर न्यायालय परिसरात मोठा गोंधळ उडाला होता.

Exit mobile version