महाराष्ट्र पोलीस अधिधनयम (1951 चा 22) याच्या कलम 22न यामधील तरतुदींनुसार, पुढील तक्तत्यातील भा.पो.से. अधिका-याांची, निर्दिष्ट पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पत्रक जारी केले आहे. त्यानुसार नवी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून मिलिंद भारंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्तही बदलण्यात आले आहेत. आता विनयकुमार चौबे हे अपर पोलिस महासंचालक पदावरून पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त बनले आहेत. पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता हे आता अपर पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था येथे नियुक्त करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था ब़ृहन्मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे आता लाचलुचपत विभागाचे अपल पोलिस महासंचालक असतील. तर मीरा भाईंदर वसई विरारचे पोलिस आयुक्त सदानंद दाते हे दहशतवादविरोधी पथक, मुंबईचे आता अपर पोलिस महासंचालक असतील.
मुंबईला मिळणार विशेष पोलीस आयुक्त मुंबईत विशेष पोलीस आयुक्त पदाची जोरदार चर्चा पोलीस दलात आणि वरिष्ट अधिकारी यांच्यात सुरू आहे. मागील काही महिन्यांपासून विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्यासाठी हालचाली सुरू होत्या, व हे पद निर्माण करण्यात आले असून आज रात्री उशीरा याबाबत आदेश निघण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा: पश्चिम रेल्वेच्या सेवेत ‘यात्री ॲप’
ओटीपी शिवाय पैसे लुटण्याचे नवे तंत्र वापरले जाते का?
१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!
बस उलटून २ शाळकरी मुलांना गमवावे लागले प्राण
मुंबईला पहिला विशेष पोलीस आयुक्त कोण असणार याची उत्सुकता संपूर्ण पोलीस दलाला लागली आहे. या विशेष पोलिस आयुक्त पदासाठी जेष्ठ आयपीएस देवेन भारती यांच्या नाव सर्वात पुढे आहे.