मध्य प्रदेशातील गुना विमानतळावर विमान कोसळले!

पायलट जखमी

मध्य प्रदेशातील गुना विमानतळावर विमान कोसळले!

मध्य प्रदेशात एक विमान कोसळल्याची घटना घडली आहे.मध्य प्रदेशातील गुना विमानतळावर आपत्कालीन लँडिंगच्या प्रयत्नात एक ट्रेनी विमान कोसळले आहे.या विमानाने नीमचहून सागरकडे उड्डाण केले होते.मात्र, विमानाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाला अन ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.या विमान अपघातात महिला पायलट नॅन्सी मिश्रा जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाला होता. त्यानंतर महिला पायलटने गुना एरोड्रोमवर विमान उतरवण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान, धावपट्टीवर उतरत असताना विमानाचे नियंत्रण सुटले अन अपघात झाला.या दुर्घटनेत महिला पायलट नॅन्सी मिश्रा जखमी झाल्याची माहिती आहे.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी पायलटला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातानंतर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा :

पंतप्रधानांची दक्षिण मोहीम; भाजपला ३० जागा मिळण्याची शक्यता

हा कसला राजा हा तर भिकारी!

मलाही मुसेवाला-नफेसिंगप्रमाणे मारतील!

ममता बॅनर्जींना संदेशखालीतील घटनेचा काहीही फरक पडत नाही!

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये अपघातग्रस्त विमान दिसत आहे. विमानाचा ढिगारा सर्वत्र विखुरलेला दिसत आहे. घटनास्थळी पोलिसांचा ताफाही दिसत आहे. सध्या या विमान अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.

पोलीस उपनिरीक्षक चंचल तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ”हे विमान नीमच येथून उड्डाण करून सागर ढानाकडे जात होते.मात्र,अचानक या विमानात बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.इमर्जन्सी लँडिंगदरम्यान विमानावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.या दुर्घटनेत ट्रेनी पायलट जखमी असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version