22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषउत्तराखंडमध्ये हिमस्खलनात २८ गिर्यारोहक अडकले

उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात २८ गिर्यारोहक अडकले

दोन जणांचा मृत्यू; बचाव कार्य सुरु

Google News Follow

Related

केदारनाथनंतर आता उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात हिमस्खलनामुळे पर्वतारोहणाचे प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी बर्फाच्या डोंगरावर अडकले आहेत. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग उत्तरकाशीचे २८ प्रशिक्षणार्थी द्रौपदीच्या दांडा-2 पर्वत शिखरावर हिमस्खलनात अडकल्याची माहिती आहे. या अपघातात दोन प्रशिक्षणार्थींचाही मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

बर्फाच्या डोंगरावर अडकलेल्या प्रशिक्षणार्थींच्या सुटकेसाठी डेहराडूनहून एसडीआरएफची टीम पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलून बचाव कार्याला गती देण्यासाठी मदत मागितली आहे. मुख्यमंत्री धामी यांनी अडकलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी लष्कराच्या मदतीची विनंती केली असून, त्याबाबत त्यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

प्रशिक्षणार्थींना लवकरात लवकर सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आर्मी आणि आयटीबीपीच्या जवानांसह निमच्या टीमकडून जलद मदत आणि बचाव कार्य केले जात आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी सांगितले की, प्रशिक्षणात प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी असे एकूण १७५ जण होते. ज्यामध्ये २९ लोक हिमस्खलनाच्या कचाट्यात आले आहेत. ८ जणांना वाचवण्यात यश आले असून २१ जणांच्या बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी हेलीची मदत घेतली जात आहे.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानात शैक्षणिक संस्थेत स्फोट; ४६ मुलींसह ५३ ठार

पोलीस महासंचालकांच्या हत्येची पीएएफएफ दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी

जम्मू काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची गळा चिरून हत्या

मुंबई विमानतळावरून ९.८ कोटींचे कोकेन जप्त

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. हिमस्खलनात अडकलेल्या प्रशिक्षणार्थींना वाचवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असं सिंह म्हणाले . सिंह आजपासून दोन दिवस उत्तराखंडच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. ते चमोली जिल्ह्यातील माना आणि औली येथे जाऊन चीन सीमेवर सैनिकांसोबत दसरा साजरा करणार आहेत.

उत्तराखंडमधील १२ दिवसांत ही तिसरी घटना आहे. यापूर्वी १ ऑक्टोबरला केदारनाथ मंदिराजवळ हिमस्खलनाची घटना घडली होती. मात्र, त्यामुळे मंदिराचे कोणतेही नुकसान झाले नाही.यापूर्वी २३ सप्टेंबर रोजी मंदिराच्या मागे ५ किमी अंतरावर असलेल्या चौराबारी ग्लेशियरमध्ये हिमस्खलन झालं होतं. या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अशा घटना वारंवार घडत असल्याने चिंतेचा विषय आहे. हवामानातील बदल हे हिमनद्या वितळण्याचे मुख्य कारण आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा