पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मनमानी कारभार करणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आता ऑडी कार पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी कारवाई करत पूजा खेडकर यांची कार जप्त करून पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे.
या संदर्भात माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, खेडकर यांनी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करून खासगी कारवर व्हीआयपी नंबर प्लेटसह लाल आणि निळ्या रंगाचा दिवा लावला होता. तसेच परवानगी नसतानाही गाडीवर ‘महाराष्ट्र सरकार’ असे लिहिलेले होते. याव्यतिरिक्त वाहतूक उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनावर २६,००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा:
२० वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रुक्सने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झाडली गोळी !
विशाळ गडावर अज्ञातांकडून दगडफेक !
ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून निषेध !
शनिवारी रात्री (१३ जुलै) खेडकर यांच्या कुटुंबीयांनी गाडीच्या चाव्या चतुश्रृंगी वाहतूक पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिल्या. त्यानंतर वाहतूक पोलिस विभागाने खेडकरांना कारची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अद्याप वाहतूक विभागाकडे कागदपत्रे जमा झालेली नाहीत. दरम्यान, ३४ वर्षीय अधिकारी पूजा खेडकर या सत्तेचा गैरवापर , आक्रमक वर्तन आणि यूपीएससी निवडीतील इतर अनियमिततेमुळे वादळाच्या भोवऱ्यात आहेत.