भारतीय रेल्वेच्या कामगिरीत गुरुवारी एका ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली. जम्मू-काश्मीरमध्ये जगभरातील सर्वांच उंच रेल्वे पुलावर ट्रायल रन यशस्वी झाली. नवनिर्मित चिनाब रेल्वे पूल रामबन जिल्ह्यातील संगलदान आणि रियासी यांच्या दरम्यान बांधण्यात आला आहे. या रेल्वे मार्गावरून लवकरच रेल्वेसेवा सुरू होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ट्रायल रनच्या व्हिडीओमध्ये एक ट्रेन जम्मू-काश्मीरमधील सुंदर डोंगराच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवर बनवल्या गेलेल्या उंच रेल्वे पुलावरून धावत असल्याचे दिसत आहे. ‘उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाच्या संगलदान-रियासी दरम्यान मेमू रेल्वेची यशस्वी चाचणी,’ असे ट्वीट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले.
काय आहे यूएसबीआरएल?
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत उधमपूरपासून बारामुल्लापर्यंत २७२ किमी लांब रेल्वेमार्ग बांधण्यात आला आहे. हा मार्ग काश्मीर खोऱ्याला भारतीय रेल्वेच्या जाळ्याशी जोडतो. स्वातंत्र्यानंतर भारतीय रेल्वेकडून पूर्ण केल्या गेलेल्या सर्वांत आव्हानात्मक प्रकल्पांपैकी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे.
हे ही वाचा..
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना जामीन
उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मराठा आरक्षणाचे मारेकरी!
बँक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अमटेक कंपनीसंबंधित ३५ ठिकाणांवर छापेमारी
बिहार सरकारला न्यायालयाचा झटका !
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
यूएसबीआरएल प्रकल्पात ३८ भुयारे (एकूण लांबी ११९ किमी) आहेत.
सर्वांत लांब भुयाराची (टी-४९) लांबी १२.७५ किमी आहे.
हा देशातील सर्वांत लांब भुयारी मार्ग आहे. प्रकल्पात एकूण ९२७ पूल (एकूण लांबी १३ किमी) आहेत.
या पुलांमध्ये चिनाब पुलाचाही समावेश आहे.याची एकूण लांबी १३१५ मीटर आहे.
नदीच्या तळापासून हा पूल ३५९ मीटर उंच आहे.
हा पूल आयफेल टॉवरपेक्षा सुमारे ३५ मीटर उंच आहे.