उत्तराखंडमध्ये रेल्वे अचानक उलट धावली

उत्तराखंडमध्ये रेल्वे अचानक उलट धावली

उत्तराखंडमध्ये तनकपूर येथे जाणारी गाडी उलट्या दिशेत सुमारे ३५ किलोमीटर धावल्याने गाडीतल्या प्रवाशांत खळबळ उडाली होती.

पुर्णगीरी जनशताब्दी एक्सप्रेस दिल्लीहून तनकपूरच्या दिशेने जात होती. वाटेत एका गुराला धडक दिल्यानंतर ही गाडी अचानक उलट्या दिशेने जाऊ लागली. त्यामुळे गाडीतल्या प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली होती.

याबाबत, गाडी रुळावरून घसरली नसल्याची माहिती उत्तर पूर्व रेल्वेतर्फे देण्यात आली. सर्व प्रवासी सुरक्षित असून नंतर त्यांना सुरक्षितरित्या तनकपूर येथे पोहोचवण्यात आले.

हे ही वाचा:

उरातला साधेपणा हे मनोहर पर्रिकरांचे वैशिष्ट्य होते

नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधल्या सभेत बोलणार

“हा अपघात रेल्वेने एका गुराला धडक दिल्यानंतर ही गाडी उलट आली. ही गाडी खातिमा यार्डापासून थोड्या अंतरावर सुरक्षितपणे थांबली. या प्रकरणात कुठेही गाडी रुळावरून घसरली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित होते. नंतर त्यांना तनकपूरला सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले. त्यानंतर ए ग्रेडची चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.” असे रेल्वे मंत्रालयाकडून प्रसारित करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे.

इंजिन ड्रायव्हर आणि गार्ड हे दोघेही यावेळी गाडीत उपस्थित होते. या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांची चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.

पुर्णगीरी जनशताब्दी एक्सप्रेस दिल्ली आणि तनकपूर यांच्या दरम्यान धावते.

Exit mobile version