मनमाडमधील ४५ प्रवाशांची ट्रेन त्यांची कोणतीही चूक नसताना चुकली… दिल्लीहून निघालेली ‘वास्को द गामा निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेस’ ही ट्रेन मार्ग वळवल्यामुळे मनमाड जंक्शनला नियोजित वेळेच्या तब्बल दीड तास आधी पोहोचली. मात्र ट्रेन पोहोचली तर पोहोचली, पण केवळ पाच मिनिटे थांबून प्रवाशांची वाट न पाहता निघून गेली. आणि या सर्व घडामोडींबद्दल अनभिज्ञ असलेल्या प्रवाशांची ट्रेन चुकली.
ट्रेनच्या आगमनाची नियोजित वेळ सकाळी १० वाजून ३५ मिनिटांची होती. परंतु ही ट्रेन गुरुवारी सकाळी नऊ पाच मिनिटांनी आली आणि नऊ वाजून १० मिनिटांनी निघाली. सकाळी ९.४५ च्या सुमारास गाडीत चढण्याचे नियोजन करणारे ४५ प्रवासी स्थानकावर पोहोचल्यानंतरच ही बाब उघडकीस आली. त्यानंतर संतप्त झालेल्या प्रवाशांनी स्टेशन मॅनेजरच्या कार्यालयात जाऊन स्पष्टीकरण मागितले आणि पर्यायी व्यवस्थेची मागणी केली.
“गोवा एक्स्प्रेस, जी सामान्यत: मिरज, पुणे आणि दौंडमार्गे मनमाड जंक्शनला पोहोचते. मात्र ही गाडी या दिवशी वळवण्यात आली. गुरुवारी ही गाडी रत्नागिरी, पनवेल, कल्याण, नाशिकरोडमार्गे मनमाडला जाण्यासाठी मार्ग धरला. ट्रेन मनमाडला लवकर आली. पण ट्रेनने नियमित सुटण्याच्या वेळेपर्यंत थांबायला हवे होते,” असे मध्य रेल्वे झोनचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.
हे ही वाचा:
ठिसूळ हाडे, ९० फ्रॅक्चर; पण अहमदाबादच्या तरुणाने घेतली आयआयटीत झेप
सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांना सोडणार नाही
विकृतीची हद्दपार; आयफोन विकत घेण्यासाठी पोटच्या मुलाला विकलं
‘नवीन नाव पण तेच चेहरे, तीच पापे’
दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनच्या पाठोपाठ मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना बसवण्यात आले होते. दोन्ही गाड्यांना भुसावळ जंक्शनपर्यंत सामाईक मार्ग आहे, असे मानसपुरे यांनी सांगितले. गीतांजली एक्स्प्रेसचा मनमाड येथे नियोजित थांबा नाही, मात्र तिला सकाळी ११.२६ वाजता येथे थांबा देण्यात आला. दिल्लीला जाणारी ट्रेन चुकलेले ४५ प्रवासी त्यात चढले. जळगाव जंक्शनच्या स्टेशन मॅनेजरला हे प्रवासी स्टेशनवर येईपर्यंत गोवा एक्स्प्रेस रोखून ठेवण्यास सांगण्यात आले होते,” असे आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.