देशातील सर्वांत महत्त्वपूर्ण प्रकल्प उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (यूएसबीआरएल)चे काम सुरू आहे. जगातील सर्वांत उंच रेल्वे उड्डाणपूल (चिनाब रेल्वे पूर) काश्मीरमध्ये तयार झाला आहे. लवकरच यावरून रेल्वे धावू लागतील. या दरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चिनाब रेल्वे पुलावरून जाणाऱ्या रेल्वेचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.
‘संगलदान ते रियासीपर्यंत आज पहिली ट्रायल ट्रेन यशस्वीपणे चालवली गेली. ज्यात चिनाब उड्डाणपुलावरून ही ट्रेन धावली. यूएसबीआरएल प्रकल्पाची सर्व कामे जवळजवळ पूर्ण झाली आहेत. केवळ बोगदा क्रमांक १चे काम अंशतः बाकी आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.
वर्षअखेरपर्यंत यूएसबीआरएल प्रकल्प पूर्ण होईल
उधमपुरा श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक प्रकल्प या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन २० फेब्रुवारी, २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.
हे ही वाचा:
‘भाजपवर शंका उपस्थित करण्याचा प्रश्नच नाही’
९०हून अधिक देशांची युक्रेनमधील शांततेसाठी चर्चा!
प. बंगालमध्ये मालगाडीची कांचनगंगा एक्स्प्रेसला धडक; चार जणांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा
चिनाब नदीवर सुमारे ३५९ मीटर उंच चिनाब रेल्वे पूल
जम्मू-काश्मीरमध्ये उभारण्यात आलेला जगभरातील सर्वांत उंच रेल्वे पूल चिनाब नदीपासून सुमारे ३५९ मीटर उंच आहे. चिनाब रेल्वे पूल उभारण्यासाठी एकूण ३० हजार मेट्रिक टन स्टीलचा उपयोग करण्यात आला आहे. या पुलासाठी एकूण एक हजार ४८६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा पूल २६० किमी प्रति तास हवेच्या वेगाचा सामना करू शकतो. या पुलाची उभारणी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पांतर्गत या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे.