बालामाझ पॅसेंजर साडेतीन तास उशिराने शहाजहानपूर रेल्वे स्थानकावर पोहोचली. याचे कारण सिंग्नल लागला किंवा अपघात झाला असे नव्हते तर चक्क बालामाझ पॅसेंजर रेल्वेच्या चालकाची झोप पूर्ण झाली नव्हती म्हणून त्या पठ्ठ्याने रेल्वे चालवण्यास नकार दिला. त्यामुळे सुमारे अडीच तास गाडी स्थानकात उभी करून चालकाने निवांत झोप काढली. मात्र या चालकाच्या बेजाबदारपणामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.
ही गाडी शाहजहांपूरहून सकाळी सात वाजता सुटणार होती, मात्र चालकाच्या झोपेमुळे गाडी साडेनऊपर्यंत शाहजहांपूर रेल्वे स्थानकावर उभी होती. ड्रायव्हरची झोप पूर्ण झाल्यावर तो ट्रेन चालवायला आला आणि इथून गाडीने वेग घेतला.
शाहजहानचे स्टेशन मास्तर जेपी सिंह यांनी सांगितले की, लोको पायलट ही ट्रेन बालामाऊ ते रोजा पर्यंत नेतात. रोजा येथे रात्रीच्या विश्रांतीनंतर हा लोको पायलट सकाळी ट्रेन परत नेतो. मात्र त्यादिवशी रात्रीची विश्रांती पूर्ण न झाल्यामुळे, लोको पायलटने सकाळी ट्रेन घेण्यास नकार दिला होता, त्याची झोप पूर्ण झाल्यावर त्याने ट्रेन चालवली.
हे ही वाचा:
पंजाब निवडणुकीसाठी असा असणार भाजपचा फॉर्म्युला
रतन टाटांना ‘आसाम वैभव’ पुरस्कार
श्रीनभ अग्रवालला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार
ही घटना का घडली
बालामाझ पॅसेंजर साडेतीन तास उशिराने रात्री एक वाजण्याच्या सुमारास शहाजहानपूर रेल्वे स्थानकावर पोहोचली. ज्या चालकाने बालमाळ येथून गाडी आणली होती, त्यालाच ही गाडी सकाळी बालमाळ येथे न्यावी लागणार होती. मात्र, रात्री उशिरा आल्याने चालकाला पुरेशी झोप मिळाली नाही, त्यामुळे त्याने सकाळी गाडी चालवण्यास नकार दिला. त्याची झोप पूर्ण झाल्यावरच तो ट्रेन चालवेल असे त्याने सांगितले.