नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे २१ डबे घसरले; पाच ठार, ८० जखमी

बुधवारी रात्री साडेनऊ वाजता हा अपघात झाला.

नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे २१ डबे घसरले; पाच ठार, ८० जखमी

नवी दिल्लीहून कामाख्या येथे जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचा बुधवारी रात्री अपघात झाला. बक्सर जंक्शनजवळ रेल्वेचे २१ डबे घसरले. या अपघातात आतापर्यंत पाच ठार तर ८० जण जखमी झाल्याचे समजते आहे.

 

बुधवारी रात्री साडेनऊ वाजता हा अपघात झाला. अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी मदतकार्यासाठी धाव घेतली. अपघाताचे ठिकाणी शहरापासून दूर आहे. ८०हून अधिक जण अपघातात जखमी झाले असून जखमींना बाहेर काढले जात आहे. सर्व जखमींना बाहेर काढले जाईल, तेव्हाच जखमींचा नेमका आकडा कळू शकेल.

हे ही वाचा:

‘हमासला पृथ्वीवरून नामशेष करू’!

मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलीस भरतीला सुरुवात!

खलिस्तानी समर्थक दहशतवाद्यांना घरी ठेवणाऱ्याला कॅनडाचा आश्रय

भारताचा जीडीपी ६.३ टक्के राहण्याची शक्यता

रेल्वेचे वैद्यकीय पथक, अधिकारी आणि आपत्ती निवारण रेल्वेलाही घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. रेल्वेने अधिकृतरीत्या अद्याप मृतांचा आकडा जाहीर केला नसला तरी घटनास्थळी असलेल्या बचावपथकांनी आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढले आहेत. तर, अन्य जखमींना प्रथमोपचारासाठी पाठवण्यात आले आहे. ‘बक्सरमध्ये बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, रेल्वे अधिकारी आणि स्थानिक लोक हे सर्व मिळून बचावकार्यात मदत करत आहेत. रेल्वेच्या वॉर रूमनेही बचावकार्य सुरू केले आहे,’असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

 

डाऊन मार्गावर रेल्वेवाहतूक कठीण

 

दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेमार्गाला डाऊन मार्ग म्हटले जाते. याच मार्गावरून नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस उत्तर प्रदेशनंतर बिहार आणि मग ईशान्य भारतात जाते. मात्र या अपघातामुळे या मार्गाची अवस्था पुरती बिकट झाली आहे. तांत्रिक टीम लवकरच येथे पोहोचणार आहे. मात्र तोपर्यंत या मार्गावरून कोणतीही एक्स्प्रेस जाऊ शकणार नाही.

Exit mobile version