राजामौलीच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत अशा राईज रोअर रिवॉल्ट अर्थात ‘आर आर आर’ (R.R.R) या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. गुरूवार ९ डिसेंबर रोजी यु ट्युबवर हे ट्रेलर प्रदर्शित झाले. अवघ्या काही तासांत कोट्यावधी लोकांनी हे ट्रेलर पाहिले असून लोकांच्या ते पसंतीस पडताना दिसत आहे.
तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये हे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहे. तर हा चित्रपटही या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. एनटीआर, रामचरण, अजय देवगण, आलिया भट, श्रिया सरन अशी कलाकारांची तगडी फौज चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच ७ जानेवारी २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘आर आर आर’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर सुपरहिट ठरणार असल्याचा अंदाज समीक्षक आणि तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा:
‘महाविकास आघाडी सरकार आता अधिकृतरित्या वसुलीचे सरकार म्हणून मान्यताप्राप्त झालेले आहे’
महापौरांना धमकीचे पत्र; असे धमकीचे पत्र मिळणे ही गंभीर बाब भातखळकरांची प्रतिक्रिया
संजय राऊतांच्या विरोधात एफआयआर दाखल करा
या चित्रपटचे ट्रेलर आधी ३ डिसेंबर रोजी होणार होते. पण काही अपरिहार्य कारणांमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर गुरुवार, ९ डिसेंबर रोजी या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटाचे कथानक ब्रिटिश काळात पारतंत्र्यात असलेल्या भारतातील आहे. या चित्रपटातील ‘नाटु नाटु’ सारखी गाणी आधीच लोकप्रिय झालेली पाहायला मिळाली आहेत. समाज माध्यमांवर सध्या या गाण्यांची तुफान चर्चा आहे.