पावसाच्या हजेरीमुळे मुंबईत वाहतूक कोंडी!

पावसाच्या हजेरीमुळे मुंबईत वाहतूक कोंडी!

शुक्रवार, १४ रोजी सकाळी मुंबईमधील प्रमुख भागात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे नोकरीवर निघालेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाल्याचे चित्र होते. वाहतूक कोंडीची समस्याही उद्भवली होती. विशेषतः उपनगरात झालेल्या पावसाने मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. अनेक मुंबईकरांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून मुंबई वाहतूक पोलिसांकडे कोंडीची तक्रार केली.

अनेकांनी प्रमुख जंक्शन्सवर सिग्नल सुरू नसल्याच्या तक्रारी केल्या, तर काहींनी सांगितले की मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस हजर नाहीत. त्यामुळे मुंबईकरांना कामावर जाण्यासाठी वेळ लागला.

दुसरीकडे मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रत्येक वापरकर्त्याला स्वयंचलित प्रतिसादाद्वारे उत्तर दिले आहे. समस्या वायरलेस विभागाला कळवण्यात आली आहे, आणि वाहतूक कोंडी लवकरात लवकर सोडवण्यात येईल, असा प्रतिसाद वाहतूक विभागाने प्रत्येक वापरकर्त्याला शेअर केला होता.

हे ही वाचा..

पंतप्रधान मोदी श्रीनगरमधील दाल सरोवराच्या काठावर योग दिन साजरा करणार?

कुवेतमधील ४५ भारतीयांचे मृतदेह भारतात पोहोचले, अग्निकांडात गमावला होता जीव!

जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचे अविभाज्य अंग!

मंदिरे पाडून अयोध्येत विकासकामे होणार नाहीत; अंडरपास बांधणार!

याशिवाय त्यांच्या एक्सवरील अधिकृत खात्यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहनांचे बिघाड आणि इतर समस्यांमुळे वडाळा, आझाद मैदान इत्यादी अनेक ठिकाणी झालेल्या कोंडीचे अपडेट्स शेअर केले आहेत.

Exit mobile version