26 C
Mumbai
Thursday, May 8, 2025
घरविशेषहिंदू पर्यटकांना निवडून पहलगामममध्ये दहशतवाद्यांनी घातल्या गोळ्या, २७ मृत्यू

हिंदू पर्यटकांना निवडून पहलगामममध्ये दहशतवाद्यांनी घातल्या गोळ्या, २७ मृत्यू

लष्कर ए तोयबाच्या रेसिस्टन्स फ्रंटने (TRF) स्वीकारली जबाबदारी

Google News Follow

Related

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात किमान २७ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये काही परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. हा गेल्या काही वर्षांतील नागरिकांवर झालेला सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. मुख्य म्हणजे पर्यटकांवर गोळीबार करताना त्यांची ओळख पटविण्यात आली. ते मुस्लिम नाहीत, हिंदू आहेत हे पाहूनच त्यांना मारण्यात आले. पर्यटकांचे नाव आणि धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या, असे त्यातील एका मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या पत्नीने सांगितले. पाणीपुरी खात असताना त्या व्यक्तीला गोळी घालण्यात आली, अशी माहिती समोर येते आहे.

लष्कर-ए-तोयबाच्या TRF (द रेसिस्टन्स फ्रंट) या शाखेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दुपारनंतर, बैसारन मीडोज येथे घोड्यावरून पर्यटन करत असलेल्या पर्यटकांवर सैनिकी वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. महिलांचा, वृद्धांचा आणि पर्यटकांचा समावेश असलेल्या गटावर ही हल्ला झाला. या हल्ल्यात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटकातील पर्यटकांचा समावेश असल्याचे समोर येते आहे.

हे ही वाचा:

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, एकाचा मृत्यू!

मोदींच्या विमानाला आकाशात सौदीच्या विमानांनी दिली साथ

संग्राम थोपटेंनी काँग्रेसविरोधात दंड थोपटले, भाजपात केला प्रवेश!

“प्रसिद्ध कृष्णा: आयपीएलमध्ये चमकते भविष्य!”

घटनास्थळीचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये रक्ताने माखलेले पर्यटक जमिनीवर पडलेले दिसत आहेत, तर महिला आप्तस्वकीयांना शोधताना दिसतात. सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली आहे आणि परिसर सील करण्यात आला आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पहलगामसाठी रवाना झाले असून तिथे त्यांच्या बैठकांच्या माध्यमातून या सगळ्या घटनेवरील कारवाईची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. त्याशिवाय, या संपूर्ण घटनेचा आढावाही ते घेतील. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. तिथून त्यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करतानाच या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी म्हटलं, “हा हल्ला अमानवीय आहे. गेल्या अनेक वर्षांत नागरिकांवर झालेल्या कोणत्याही हल्ल्यापेक्षा हा अधिक मोठा आहे.

मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, मी पहलगाम, जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांना माझ्या संवेदना. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. या हल्ल्यामागील दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल… त्यांना सोडले जाणार नाही.”

दरम्यान, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वन्स भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली, ज्यामुळे याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटू शकतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
246,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा