26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषभुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर लोणावळ्यात संध्याकाळी ६ नंतर पर्यटकांना बंदी

भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर लोणावळ्यात संध्याकाळी ६ नंतर पर्यटकांना बंदी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडमध्ये

Google News Follow

Related

लोणावळ्यामधील भुशी डॅममध्ये पाच जण वाहून गेल्याची दुर्घटना घडली. यानंतर पर्यटन स्थळांवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. यानंतर आता थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळ्यात सायंकाळी ६ नंतर आता पर्यटकांना बंदी घातली आहे.

लोणावळ्यातील भुशी डॅम येथील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्याने खळबळ उडाली. याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. संध्याकाळी ६ नंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला असून याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही बडगा उगारला जाणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी याबद्दल माहिती दिली आहे. तसेच पुढच्या काही तासांत लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

लोणावळ्यात हुल्लडबाजी करणऱ्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. इतर पर्यटकांना त्रास होईल असे वर्तन, हुल्लडबाजी सहन करणार नाही. कारवााई निश्चित होणार आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि विकेंडला अनेक तरुण- तरुणी येतात. रात्री गोंधळ घालणे, हुल्लडबाजी करणे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी ६ नंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जर संबंधित अधिकाऱ्याने कारवाई करण्यात दिरंगाई केली तर थेट अधिकाऱ्यावरच कारवाई करणार आहे. तसे मुख्यमंत्र्यांचे आदेश आले आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींच्या आरोपांनंतर नरेंद्र मोदी संतापले, लोकसभेत गोंधळ

४२० कलमाचा अंत आता फसवणुकीसाठी कलम ३१८ !

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेजारच्या महिलेला घातला सात लाखांचा गंडा

धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लोणावळा, मुळशी, मावळ तसेच पवना परिसरातील नदी, धबधबे या ठिकाणी पाण्यात उतरून तरुणांनी अतिउत्साहीपणा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. रविवारी भुशी धरणात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. ताम्हिणीत देखील एकाचा मृत्यू झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा