24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषपुढील दोन दिवस राज्यात कोसळधारा!

पुढील दोन दिवस राज्यात कोसळधारा!

Google News Follow

Related

पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामूळे पाऊस लांबण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यात पुढील दोने ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. आज (२१ सप्टेंबर) सकाळपासूनचं मुंबईसह उपनगरात अधूनमधून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने देखील आपल्या सर्व विभागांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

हवामान खात्याकडून येत्या ४८ तासांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्याही (२२ सप्टेंबर) राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, नाशिक, साताऱ्यातील घाट माथ्यावर चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी यलो अलर्ट जाहीर केला आहे.

हे ही वाचा:

नसीब फळफळले! तालिबानींमध्ये सापडला समज असलेला एकमेव माणूस

का आहे मुंब्रा दहशतवाद्यांचा अड्डा?

हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द

१६ दिवसांनी अखेर करुणा शर्माची सुटका

विदर्भातील वाशीम, यवतमाळ, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, परभणी आणि नांदेड हे आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी वेगवान वाऱ्याच्या साथीने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याने रविवारी (१९ सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्व राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशाच्या काही भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यासह देशाच्या पूर्व व मध्य भागात आजपासून पावसाचे प्रमाण वाढणार आहे. प्रामुख्याने मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा