ऍसिड हल्ल्यातून बचावलेली मुलगी टॉपर

सीबीएसई १० वीच्या परीक्षेत ९५.२० टक्के मिळवून विद्यार्थिनी शाळेत अव्वल

ऍसिड हल्ल्यातून बचावलेली मुलगी टॉपर

चंदीगडच्या ‘इन्स्टिट्यूट ऑप ब्लाइंड’मध्ये शिकणारी, ऍसिड हल्ल्यातून बचावलेली कैफी या १५ वर्षीय विद्यार्थिनीला सीबीएसई १० वीच्या परीक्षेत ९५.२० टक्के मिळाले असून ती या शाळेत अव्वल आली आहे.

इथपर्यंतचा तिचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. येथे पोहोचण्यासाठी तिने अनेक अडथळे पार केले आहेत. कैफी केवळ तीन वर्षांची असताना हिसारमधील बुधाना गावातील तिच्या शेजाऱ्यांनी मत्सरातून तिच्यावर ऍसिड फेकले होते. या हल्ल्यामुळे तिचा चेहरा आणि हातावर गंभीर भाजल्याच्या जखमा झाल्या होत्या. त्यामुळे तिला अंधत्वही आले होते. मात्र, कैफीने हार न मारता तिच्या स्वप्नांचा पाठलाग केला. कैफीच्या वडिलांनी तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्यांना कैफी आता कायम अंधच राहील, असे सांगितले. कैफीचा संपूर्ण चेहरा आणि हात गंभीररीत्या भाजले होते. डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला खरा, परंतु ते तिची दृष्टी वाचवू शकले नाहीत.

कैफीच्या वडिलांनी कैफीला न्याय मिळवून देण्यासाठीही लढा दिला. त्यामुळे हिसारच्या जिल्हा न्यायालयाने हल्लेखोरांना दोन वर्षांची शिक्षाही ठोठावली. मात्र, शिक्षा पूर्ण केल्यानंतर हे मारेकरी आता मुक्त झाले असल्याने कैफी कुटुंबीयांची चिंता कायम आहे.

कैफी आठ वर्षांची असताना हिसारच्या अंध शाळेत शिकू लागली. तिने तिथे पहिली आणि दुसऱ्या इयत्तेचे शिक्षण पूर्ण केले. परंतु, अपुऱ्या सोयीसुविधांअभावी त्यांच्या कुटुंबीयांना चंदीगडला यावे लागले. कैफीचे वडील चंदीगडमध्ये शिपाई म्हणून काम करतात. अनेक आव्हाने उभी ठाकूनही आणि सुविधांचा अभाव असूनही कैफी अभ्यास करण्याच्या तिच्या ध्येयापासून डगमगली नाही. ती नेहमीच अभ्यासात हुषार होती. त्यामुळे तिला चंदीगडमधील ब्लाइंड इन्स्टिट्यूटमध्ये थेट सहावीत प्रवेश मिळाला.

हे ही वाचा :

किशोर आवारे हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचे नाव

आशिष शेलार यांच्याकडून मुंबईतील नाले सफाईची पाहणी

“नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ही चूक”

“सुषमा अंधारेंनी शरद पवारांऐवजी ठाकरेंसमोर रडावं”

कैफीला आयएएस अधिकारी होण्याची इच्छा आहे. कैफीच्या वडिलांनाही तिच्य कामगिरीबद्दल अभिमान वाटतो. मला यापुढे कोणत्याही मुलीची गरज नाही, या इच्छेने मी माझ्या मुलीचे नाव ठेवले होते. आता मला माझ्या मुलीचा गर्व वाटतो आहे, असे तिचे वडील अभिमानाने सांगतात.

Exit mobile version