राम मंदिर उद्घाटनासाठी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना मिळाले निमंत्रण!

विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी दिली माहिती

राम मंदिर उद्घाटनासाठी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना मिळाले निमंत्रण!

उत्तर प्रदेशातील अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी आघाडीच्या विरोधी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) कार्याध्यक्ष आलोक कुमार यांच्या म्हणण्यानुसार, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी आणि जेडी(एस) सुप्रीमो देवेगौडा यांना उद्घाटनासाठी निमंत्रण पाठवले आहे.मात्र, राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला काँग्रेस नेते उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने सांगितले आहे.

नव्याने बांधलेल्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत विरोधी पक्षांच्या अन्य नेत्यांना आणखी निमंत्रणे पाठवली जाण्याची शक्यता आहे, असे पीटीआयच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

स्थलांतर प्रश्नाच्या तोडग्यासाठी युरोपियन युनियनच्या ‘स्थलांतर धोरणा’त दुरुस्तीसाठी करार

सीरियामधील व्यक्तीला भेटण्यासाठी साकिबला पडघ्यात पाठवलं

संसद सुरक्षा भंग प्रकरणी आणखी दोघे पोलिसांच्या ताब्यात, माजी पोलीस उपअधीक्षकाच्या मुलाचा समावेश!

भ्रष्टाचार प्रकरणी तामिळनाडूचे मंत्री पोनमुडी यांना तीन वर्षीय तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत होणार्‍या या सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे आणि १५ जानेवारीपर्यंत त्याची सांगता होणार आहे . प्राणप्रतिष्ठा पूजा १६ जानेवारीला सुरू होणार आहे आणि २२ जानेवारीला सोहळ्याचा समारोप होणार आहे.

राम मंदिर अभिषेकाचा सोहळा आठवडाभर चालू राहणार आहे.सोहळ्याच्या प्रारंभाच्या निमित्ताने १७ जानेवारी रोजी अयोध्येत देवतेच्या १०० मूर्तींसह प्रभू रामाच्या जीवनातील देखावे दर्शविणारी मिरवणूक काढण्यात येणार आहे.या मिरवणुकीत भगवान रामाचे जन्मापासून ते वनवासापर्यंतचे जीवन, लंकेवरील विजय आणि अयोध्येला परत येण्यापर्यंतचे पुतळे आणि चित्रे असणार आहेत, असे मुख्य शिल्पकार रणजित मंडल यांनी सांगितले.

 

 

Exit mobile version