छत्तीसगड: सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत नक्षलवादी प्रमुखासह २९ ठार!

नक्षल प्रमुखांवर होते २७ लाखांचे बक्षीस

छत्तीसगड: सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत नक्षलवादी प्रमुखासह २९ ठार!

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) यांच्या संयुक्त कारवाईत एका नक्षलवादी कमांडरसह २९ नक्षलवादी ठार झाले आहेत.या चकमकीत तीन जवानही जखमी झाले आहेत.येथून एके-४७ रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

पोलिस अधीक्षक कल्याण एलिसेला यांनी सांगितले की, माड परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.या चकमकीत १८ हून अधिक नक्षलवाद्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.या चकमकीत एका नक्षल प्रमुखाचाही समावेश आहे.शंकर राव असे या नक्षल प्रमुखाचे नाव आहे.चकमकीत त्याचाही मृत्यू झाला.मृत नक्षल प्रमुखावर तब्बल २५ लाख रुपयांचे बक्षीस असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा:

भाजपाच्या जाहीरनाम्यात गरिबांसाठीची गृहनिर्माण योजना नाही, तृणमूलच्या साकेत गोखलेंचा खोटा दावा

अमेरिकेत हिंदूंवरील हल्ल्यांबद्दल भारतीय वंशाच्या खासदाराने व्यक्त केली चिंता!

दिनेश कार्तिक बनणार टीम इंडियाचा फिनिशर?

आयरिश टाइम्सने मोदींबद्दल केलेल्या खोडसाळपणाला भारताचे उत्तर

पोलीस अधिकारी पुढे म्हणाले की, घटनास्थळावरुन सात एके-४७ रायफल आणि तीन लाईट मशीन गनसह शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे, असेही ते म्हणाले. या चकमकीत तीन जवान जखमी झाले आहेत.

Exit mobile version