जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा (एलईटी) टॉप कमांडर अल्ताफ लल्ली मारला गेला आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. यादरम्यान दोन सैनिकही जखमी झाले आहेत.
शुक्रवारी (२५ एप्रिल) सकाळी बांदीपोरा येथे दहशतवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी बांदीपोरा येथे संयुक्त शोध मोहीम सुरू केली. या ठिकाणी दहशतवादी उपस्थित असल्याची खात्री पटताच अचानकपणे गोळीबार सुरु झाला. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा (एलईटी) टॉप कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेली ही चौथी चकमक आहे. गुरुवारी (२४ एप्रिल) याआधी सुरक्षा दलांनी उधमपूरच्या दुडू बसंतगडमध्ये काही दहशतवाद्यांना घेरले होते. या चकमकीत लष्कराचा एक जवान हुतात्मा झाला होता.
हे ही वाचा :
दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणणाऱ्या उपपंतप्रधानांवर पाकिस्तानी क्रिकेटपटू संतापला
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आसिफ शेखचे घर उडवले
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल ठोकरच्या घरावर चालवला बुलडोझर
पाकिस्तानकडून कुरघोड्या सुरूचं; नियंत्रण रेषेवर रात्रभर गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
बांदीपोरा पोलिसांनी काल लष्कर-ए-तैयबाच्या चार ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) यांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की त्यांना गुप्त माहिती मिळाली होती की लष्करशी संबंधित काही ओव्हर ग्राउंड वर्कर्स पोलिसांवर आणि स्थानिक नसलेल्या लोकांवर हल्ला करण्याचा कट रचत आहेत. या गुप्तचर माहितीच्या आधारे, बांदीपोरा पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी घेराबंदी करत चार ओव्हर ग्राउंड वर्कर्सना अटक केली.