पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून सैफुल्लाह कसुरीचे नाव समोर! 

सुरक्षा एजन्सीकडून तपास सुरु

पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून सैफुल्लाह कसुरीचे नाव समोर! 

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन परदेशी नागरिकांसह किमान २७ जणांचा मृत्यू झाला. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या प्रतिबंधित दहशतवादी गटाची शाखा असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंटने’ या हल्ल्याची जबाबदारी घेतली. या हल्ल्याप्रकरणी सुरक्षा एजन्सीकडून तपासणी सुरु आहे. याच दरम्यान, या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून सैफुल्लाह कसुरी याचे नाव पुढे येत आहे.

सैफुल्लाह कसुरी उर्फ ​​खालिद हा लष्कर-ए-तैयबाचा एक वरिष्ठ आणि विश्वासू फील्ड कमांडर मानला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, सैफुल्लाह लष्करचा संस्थापक हाफिज सईदच्या संरक्षणाखाली काम करतो. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधून कार्यरत असलेला हा दहशतवादी गेल्या अनेक वर्षांपासून खोऱ्यात दहशत पसरवण्याच्या कटाचा सूत्रधार आहे. गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे की कसुरीने सीमापार घुसखोरी आणि स्थानिक दहशतवादी मॉड्यूलवर अनेक वेळा लक्ष ठेवले आहे.

सैफुल्लाह कसुरी उर्फ ​​खालिद याचा एक जुना व्हिडीओ समोर येत आहे. खैबर पख्तूनख्वा येथील एका रॅलीत बोलताना तो म्हणतो, “आज २ फेब्रुवारी आहे आणि आज मी वचन देतो की २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपण काश्मीर काबीज करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू.”

येत्या काळात आमचे मुजाहिदीन काश्मीरमध्ये हल्ले तीव्र करतील. २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत काश्मीर स्वतंत्र होईल अशी आशा असल्याचे सैफुल्लाह कसुरीने म्हटले होते. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मोठ्या संख्येने दहशतवादी उघडपणे उपस्थित होते.

हे ही वाचा : 

उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी हे पारंपरिक उपाय अवश्य आजमवा

संस्कृत जनतेपर्यंत पोहोचवण्याचा योगी सरकारचा काय संकल्प

पहलगाम हल्ल्यात दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश!

पहलगाम हल्ल्याबद्दल नौशादने केले पाकिस्तान, दहशतवाद्यांचे अभिनंदन, मुसक्या आवळल्या

दरम्यान, याशिवाय अबू मुसाचे नावही समोर येत आहे. फर्स्टपोस्टच्या वृत्तानुसार, १८ एप्रिल रोजी रावलकोटमधील एका रॅलीत मुसाने म्हटले होते की, ‘जिहाद सुरूच राहील. काश्मीरमध्ये बंदुका बोलतील आणि शिरच्छेद सुरूच राहतील, असे त्याने म्हटले होते.

Exit mobile version