इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा नुखबा फोर्सचा सर्वोच्च कमांडर ठार!

गाझा शहर ताब्यात घेण्यासाठी इस्रायल १०,००० जवान पाठवण्याच्या तयारीत

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा नुखबा फोर्सचा सर्वोच्च कमांडर ठार!

इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाचा नववा दिवस आहे. इस्रायल-हमासच्या युद्धात हमासचा नुखबा फोर्सचा सर्वोच्च कमांडरला ठार मारण्यात आले आहे.हमासचा कमांडर बिल्लाल अल-केद्रा याला ठार मारल्याचे इस्रायली लष्कराकडून सांगण्यात आले आहे.तसेच गाझा पट्टीतील हवाई, भूदल आणि नौदल यांच्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी ‘इस्रायल डिफेन्स फोर्स’ (IDF) तयार असल्याचे सांगण्यात आले आहे.इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा सीमेजवळ सैनिकांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितले की, सामना करण्यासाठी अधिक जवान इकडे येत आहेत.त्यानंतर हमासचा कमांडर बिल्लाल अल-केद्रा हा ठार झाल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

शनिवारी रात्री गाझामध्ये इस्रायल लष्कराकडून हवाई हल्ले सुरूच होते.या हवाई हल्ल्यात हमासच्या उच्च लष्करी शाखेचा नुखबा फोर्सचा सर्वोच्च कमांडर बिल्लाल अल-केद्रा याला ठार करण्यात आल्याचे लष्कराने घोषित केले.इस्रायलच्या हल्ल्याला घाबरून हजारो पॅलेस्टिनी उत्तर गाझामधून पळून जात आहेत. इस्रायल आणि हमासच्या युद्धात आतापर्यंत ३,५०० हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे

इतिहास घडणार; छत्तीसगडमध्ये ‘बुलेट’वर ‘बॅलेट’चे यश

विराट कोहलीने बाबरला दिली स्वाक्षरी केलेली जर्सी!

ईडीचे अधिकारी असल्याचे सांगत तीन कोटींची लूट!

इस्रायल संरक्षण दलाने शनिवारी केलेल्या हवाई हल्ल्यात हमास कमांडर बिल्लाल अल-केद्रा याचा मृत्यू झाला.बिलाल अल-केद्रा हा हमासच्या सैन्याच्या एलिट कमांडो विंग नुखबा फोर्सचा कमांडर होता.दक्षिण इस्रायलमधील किबुट्झ निरीम आणि नीर ओझवर करण्यात आलेल्या हल्ल्याला बिलाल अल-केद्रा जबाबदार होता.तसेच हमासच्या दहशतवादी संघटनेतील अनेक दहशतवाद्यांना संपवण्यात आल्याचे इस्रायल डिफेन्स फोर्सकडून सांगण्यात आले.
इस्रायली सैन्याने जाहीर केले आहे की, पॅलेस्टाईनमधील गाझा पट्टीवर सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत.गाझा शहर ताब्यात घेण्यासाठी इस्रायल १०,००० सैन्य पाठवण्याची योजना आखत आहे.मात्र, ही कारवाई कधी सुरू होईल, हे लष्कराने सांगितलेले नाही.तसेच दहशतवाद्यांना जगात कोठेही स्थान नसल्याचे, इस्रायल संरक्षण दलाकडून सांगण्यात आले आहे.

 

Exit mobile version