पश्चिम बंगालच्या सिलिगुडी सफारी प्राणिसंग्रहालयातील ‘अकबर’ नावाचा सिंह आणि ‘सीता’ नावाची सिंहीण यांना एकत्र एका पिंजऱ्यात ठेवल्याने चांगलाच वाद पेटला. या प्रकरणी त्रिपुराचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव आणि पर्यावरण-पर्यटन विभाग) प्रवीण लाल अग्रवाल यांना निलंबित करण्यात आले आहे.त्रिपुरा सरकारने शनिवारी ही कारवाई केली आहे.या नावांमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप विहिंपने केला होता.त्यानुसार विश्व हिंदू परिषदेने (विहिप) कोलकाता उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती.यानंतर त्रिपुराचे वन अधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे.
प्रवीण लाल अग्रवाल हे १९९४ च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत.ते त्रिपुरा राज्यात वन्यजीव वॉर्डन म्हणून कार्यरत होते.अकबर’ नावाचा सिंह आणि ‘सीता’ नावाची सिंहीण ही जोडी त्रिपुरातील सेपाहिजाला झूलॉजिकल पार्कमधून पश्चिम बंगालच्या सिलिगुडी सफारी प्राणिसंग्रहालयात आणण्यात आली होती. या जोडीला सिलीगुडीला पाठवताना वन अधिकारी प्रवीण लाल अग्रवाल यांनी याच नावाने पाठविली होती, तशी नोंदणी त्यांनी डिस्पॅच रजिस्टरमध्ये नोंदवली होती.
हे ही वाचा:
भारताचा इंग्लंडवर पाच विकेट्स राखून विजय; सामन्यासह मालिका खिशात
गुजरात मानवी तस्करी प्रकरणातील ‘डर्टी हॅरी’ला अमेरिकेत अटक
अदानी यांचे लक्ष आता इलेक्ट्रिक गाड्यांवर!
दारिद्र्यपातळी लक्षणीयरीत्या ५ टक्के खाली
ही प्राण्यांची जोडी जेव्हा सिलिगुडी सफारी प्राणी संग्रहालयात आल्यानंतर त्यांना एकत्र एका पिंजऱ्यात ठेवण्यावर विहिंपने आक्षेप घेतला.धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत विहिंपने कोलकाता उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली.यावर २१ फेब्रुवारी रोजी कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या जोडीची नावे बदलण्याचे आदेश दिले.तथापि, बंगाल वनविभागाने स्पष्ट केले की, ही नावे त्रिपुराने दिली आहेत आणि कोणत्याही बदलाची जबाबदारी त्रिपुरा प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांची आहे.
दरम्यान, ‘अकबर’ नावाचा सिंह आणि ‘सीता’ नावाची सिंहीण ही नावे त्रिपुरा वन्यजीव अधिकाऱ्यांनी प्राण्यांच्या देवाणघेवाणी कार्यक्रमादरम्यान दिली होती हे तपासात उघड झाल्यानंतर त्रिपुरा सरकारने वनाधिकारी प्रवीण लाल अग्रवाल यांना निलंबित केले आहे.