आयपीएलमध्ये सर्वाधिक लांब षटकार ठोकणारे टॉप पाच फलंदाज

आयपीएलमध्ये सर्वाधिक लांब षटकार ठोकणारे टॉप पाच फलंदाज

यंदाच्या आयपीएलच्या मोसमात धावांचा पाऊस पडताना दिसत आहे. चौकार आणि षटकारांची आतीषबाजी प्रेक्षकांना पाहायला आवडते. या मोसमातही खेळाडू चाहत्यांना चौकार आणि षटकार मारून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनत आहेत. आयपीएलच्या या मोसमातही जोरदार धावा आणि षटकारांचा पाऊस पडत आहे. खेळाडू लांबलचक षटकार मारून विक्रम करण्यापासून थांबायचे नाव घेत नाही आहेत. आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत १०८, १०६ आणि १०३ मीटर लांबीचे षटकार ठोकले गेले आहेत.

आयपीएल २०२४ मधील सर्वाधिक लांब षटकार ठोकणारे पाच फलंदाज
दिनेश कार्तिक
हेनरिक क्लासेन
निकोलस पूरन
व्यंकटेश अय्यर
ईशान किशन

दिनेश कार्तिक
सर्वाधिक लांब षटकार मारणाऱ्यांच्या यादीत दिनेश कार्तिक पहिल्या क्रमांकावर आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर एसआरएस विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२४च्या तिसाव्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला. या सामन्यात दिनेशने १०८ मीटर लांब षटकार ठोकला होता. या सामन्यात धावांचा पाऊस पडला होता. या सामन्यात कार्तिकने ३५ चेंडूत ८३ धावा केल्या. यात ७ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता.

हेनरिक क्लासेन
सर्वाधिक लांब षटकार मारणाऱ्यांच्या यादीत हेनरिक क्लासेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२४च्या तिसाव्या सामन्यात हेनरिकने १०६ मीटर लांब षटकार मारला. या सामन्यात क्लासेनने ३१ चेंडूत ६७ धावा केल्या. यामध्ये ७ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता.

निकोलस पूरन
सर्वात लांब षटकार मारणाऱ्यांच्या यादीत निकोलस पूरन तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल २०२४ च्या पंधराव्या सामन्यात पूरनने आरसीबीविरुद्ध ही कामगिरी केली. पुरणने १०६ मीटर लांब षटकार मारला होता. या सामन्यात निकोलस पूरनने २१ चेंडूत ५ षटकार आणि १ चौकारासह ४० धावा केल्या.

व्यंकटेश अय्यर
व्यंकटेश अय्यर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. आयपीएल २०२४ च्या दहाव्या सामन्यात अय्यरने आरसीबी विरुद्ध १०६ मीटर लांब षटकार ठोकला. या सामन्यात व्यंकटेशने ३० चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांसह ५० धावा केल्या.

हेही वाचा :

इराकमधून सीरियातील अमेरिकी लष्करी तळावर पाच रॉकेट डागले!

न्यूज २४ चा माधवी लता यांच्याबाबत खोडसाळपणा, पोस्ट हटवली!

सांगलीतून विशाल पाटील लोकसभा अपक्ष लढणार?

चकमकीत मारल्या गेलेल्या माओवाद्यांचा मोठ्या हल्ल्याचा कट होता

ईशान किशन
सर्वाधिक लांब षटकार मारणाऱ्या या यादीत इशान किशन पाचव्या स्थानावर आहे. इशानने हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एसआरएचविरुद्ध १०३ मीटर लांब षटकार ठोकला होता. या सामन्यात इशान किशनने १३ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकारांसह ३४ धावा केल्या.

आश्चर्यकारक बाब…
आयपीएलमधील पहिले चार लांब षटकार रॉयल चॅलेंजर्स आरसीबी विरुद्ध मारले गेले आणि हे चारही षटकार बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर मारले गेले.

Exit mobile version