महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी झालेल्या पावसाचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे. अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रब्बी हंगामाची पिके खराब झाली आहेत. त्यामुळे बाजारातही भाजीपाल्याच्या किमती वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
नुकताच महाराष्ट्राच्या काही भागात झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा पिकांना बसला आहे. त्यामुळे बाजारात येणारी भाजीही बऱ्याच मोठ्या प्रमाणात खराब आणि सडलेली निघत आहे. त्यामुळे बरिचशी भाजी ग्राहकांना न विकताच फेकून द्यावी लागत आहे. परिणामी भाजीची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती बाजारपेठांमध्ये उद्भवली आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून भाजीपाल्याच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळत आहेत.
हे ही वाचा:
नवी मुंबईतील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष मागत होता खंडणी, गुन्हा दाखल
भावना गवळींना ईडीचे समन्स मिळालेच नाही!
मोदी सरकार मांडणार क्रिप्टोकरन्सीचे विधेयक
निलेश साबळे म्हणाले, राणे साहेब पुन्हा अशी चूक होणार नाही!
बुधवार, २४ नोव्हेंबर रोजी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेले पाहायला मिळाले. यापैकी अनेक ठिकाणी टोमॅटोच्या किंमती शंभरीच्या घरात पोहोचलेल्या आढळून आल्या. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत आहे.
अवकाळी पावसामुळे घटलेले उत्पादन, इंधन दरवाढ आदी कारणांमुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खचार्त वाढ झाल्याने ही दरवाढ करण्याशिवाय पयार्य नसल्याचे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.