भाव भडकले; टोमॅटो झाले ‘लाल’

भाव भडकले; टोमॅटो झाले ‘लाल’

महिनाभरापूर्वी लिंबाच्या भावाने धुमाकूळ घातला होता. मात्र आता टोमॅटोच्या भावाने लोकांचे बजेट बिघडवले आहे. बाजारात टोमॅटोचा भाव ८० ते १०० रुपये किलो झाला आहे.

गेल्या आठवड्यात टोमॅटोचे भाव ६० ते ७० रुपये होता. सध्या पुणे आणि मुंबईत किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव ८० ते १०० रुपये किलोदरम्यान आहेत. येत्या काही काळात टोमॅटोचा पुरवठा न वाढल्यास टोमॅटोचे भाव प्रति किलो १०० रुपयाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

टोमॅटोची अपुरी लागवड आणि कमी पुरवठा यांमुळे शहरातील किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव वाढले आहेत. तसे सर्व भाज्यांच्या किमती गेल्या महिन्याच्या तुलनेत किमान ४० ते ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. पुढील तीन ते चार आठवडे टोमॅटोचे भाव कमी होण्याची शक्यता नाही. कमी उत्पन्न मिळाल्याने अनेक उत्पादकांनी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये लागवड सोडून दिली होती. तसेच, नुकसानीच्या भीतीने शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही, असे एका टोमॅटो उत्पादकाने सांगितले आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेचे नेते यशवंत जाधव ईडीच्या रडारवर

भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्याची पंजाब मंत्रिमंडळातून हकालपट्टी

टेक्सासमध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

आंध्रप्रदेशमधील नामांतराचा वाद विकोपाला; आमदाराचे घर पेटवले

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा टोमॅटो उत्पादन कमी घेतले. उत्पादन कमी झाल्याने त्याचा परिणाम मागणीवर झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच आगामी काही दिवसात टोमॅटोची आवक न वाढल्यास सर्वसामांन्याना आणखी चढ्या दराने टोमॅटो खरेदी करावा लागू शकतो.

Exit mobile version