केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्यात येतील. टोलच्या जागी जीपीएस यंत्रणा बसवण्यात येईल, असे नितीन गडकरी म्हणाले. सर्व टोलनाके रद्द करण्याच्या योजनेवर सरकार काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. प्रवासी रस्तेप्रवास जेव्हढा करतील, तेव्हढाच त्यांना टोल द्यावा लागेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम सुरु असल्याचं गडकरींनी नमूद केलं आहे.
उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीचे खासदार कुंवर दानिश अली यांनी महापालिकेच्या टोलचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर गडकरींनी हे उत्तर दिलं. गडकरींनी मागील सरकारकडे बोट दाखवत, टोलनाक्यांद्वारे मलई खाण्यासाठी असे छोटे छोटे टोल उभारण्यात आल्याचेही सांगितले. शहरांच्या सीमांवर असे टोल असणे चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
हे ही वाचा:
उरातला साधेपणा हे मनोहर पर्रिकरांचे वैशिष्ट्य होते
सचिन वाझेंनी वापरलेला शर्ट एनआयएच्या ताब्यात
उत्तराखंडमध्ये रेल्वे अचानक उलट धावली
पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगणा मध्ये बॉम्बहल्ला, हिंसाचाराचा केवळ ट्रेलर?
रशियन सरकारच्या मदतीने २ वर्षांत संपूर्ण देश टोलनाका मुक्त होणार असल्याची माहितीही गडकरींनी यावेळी दिली. या जीपीएस प्रणालीतून टोल थेट बँक खात्यातून वजा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. वाहनांच्या हालचालीच्या आधारे टोल वसूल होणार असून, तंत्रज्ञानामुळे पारदर्शक व्यवहार, कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
ही जीपीएस प्रणाली लागू केल्यानंतर टोलचे पैसे थेट बँक खात्यातून वळते होतील.सरकार जुन्या वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्याची योजना आखत असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या टोल उत्पन्नात ५ वर्षात यामुळे प्रचंड वाढ होईल, असेही ते म्हणाले.