महायुती सरकारचा मोठा निर्णय; मुंबईकर झाले ‘टोल’मुक्त!

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार

महायुती सरकारचा मोठा निर्णय; मुंबईकर झाले ‘टोल’मुक्त!

राज्यात कधीही विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते आणि अशातच आचारसंहिताही कधीही लागू शकते. यापूर्वी सरकारकडून महत्त्वाची कामे हातावेगळी करण्याची गडबड सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठका पार पडत असून महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. अशातच नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळ बैठक पार पडली.

सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून मुंबईकरांना टोलमाफी केली जाणार आहे. असा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मुंबईच्या सीमेवरील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि मुलुंड या टोलनाक्यांवर टोलमाफी असणार आहे. लहान वाहनांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशमध्ये दुर्गा मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीत हिंसाचार; एकाचा मृत्यू

ट्रम्प यांच्या कॅलिफोर्नियाच्या कोचेलामधील रॅलीजवळून सशस्त्र व्यक्तीला अटक

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी हत्येत रियल इस्टेटमधील बड्या विकासकाच्या नावाची चर्चा

बाबा सिद्दीकींची घटना गंभीर, पण शरद पवारांच्या नजरेसमोर केवळ ‘सत्तेची खुर्ची’

माहितीनुसार, मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि मुलुंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे. मात्र, अटल सेतूसाठी हा नियम लागू केला जाणार नाही. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा मुंबईतील नागरिकांसोबतच मुंबई बाहेरून मुंबईत येणाऱ्या वाहनांना देखील होणार आहे.

नसिरुद्दीन शहांचं करायचं काय ?  Mahesh Vichare | Naseeruddin Shah | Baba Siddique | Sanatana Dharma

Exit mobile version