जपानची राजधानी टोकियो येथे आजपासून ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली आहे. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे ऑलिम्पिक खेळ पुढे ढकलण्यात आले होते. पण एका वर्षानंतर ऑलिम्पिक कोरोना महामारी सुरू असताना खेळवली जात आहे. टोकियो ऑलिम्पिक २०२१ चा उद्घाटन सोहळा सुरू झाला आहे. कोरोना साथीमुळे या समारंभात भारतातील २२ खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यांच्यासमवेत या सोहळ्यास ६ अधिकारीही सहभागी झाले आहेत.
भारतीय संघाच्या या संचलनात भारतीय पुरुष हॉकी टीमचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि बॉक्सर मेरी कोम हे ध्वजवाहक होते.
भारतीय संघाने संचलनात सहभाग घेतला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो सोहळा थेट पहिला. भारतीय संघ संचलनादरम्यान स्टेडियममध्ये अवतरल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उभे राहून टाळ्याही वाजवल्या.
#WATCH | Prime Minister Narendra Modi stands up to cheer athletes as the Indian contingent enters Olympic Stadium in Tokyo during the opening ceremony.#TokyoOlympics pic.twitter.com/SUheVMAqIK
— ANI (@ANI) July 23, 2021
कोरोना संसर्गाने यंदाचे ऑलिम्पिक हे प्रेक्षकांविना पार पडणार आहे. उद्घाटन सोहळ्यासाठीही स्टेडियममध्ये मोजक्याच लोकांना परवानगी देण्यात आली होती. रिकाम्या स्टेडियममध्ये संचलन झाले असले तरी जगभरातील क्रीडाप्रेमींनी घरातून ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याचा आनंद घेतला.
भारतातातर्फे टोकियो ऑलिम्पिकमध्ये १२५ खेळाडू भाग घेत आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताचे तिरंदाजी आणि बॉक्सिंग खेळाडू मैदानात उतरतील. भारताची स्टार आर्चर दीपिका कुमारी ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी नशीब आजमावत आहे. दीपिका कुमारीकडून भारताला सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.
हे ही वाचा:
चिपळूणमध्ये ऑक्सिजन अभावी ८ रुग्णांचा मृत्यू
तुमच्या तिजोरीची किल्ली हरवली, भ्रष्टाचार करायला ही किल्ली रात्रीच सापडते
आधीच लॉकडाऊन, त्यात पावसानेही झोडपलं
रायगडमध्ये दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू
याशिवाय तरुणदीप राय, अतनू दास आणि प्रवीण जाधव हेदेखील तिरंदाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तीन भारतीय बॉक्सर लव्हलिना, विकास क्रिशन आणि सतीश कुमार स्वतंत्र स्पर्धांमध्ये भाग घेतील.