भारत आणि अमेरिका या दोन्ही देशाचे आतापर्यंतचे संबंध एक उच्चपातळीवर आहेत आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्यांना एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाणार असल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले.तसेच हे द्विपक्षीय संबंध चांद्रयानाप्रमाणे चंद्रावर पोहचतील, त्यापेक्षाही उंचावर जाणार असल्याचे जयशंकर म्हणाले.
भारतीय दूतावासाकडून शनिवारी ‘सेलिब्रेटिंग कलर्स ऑफ फ्रेंडशिप’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री जयशंकर बोलत होते.’इंडिया हाऊस’ येथे हा कार्यक्रम पार पडला.अमेरिकेच्या विविध भागातून अमेरिकन आणि भारतातील शेकडो नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.जयशंकर म्हणाले की, आज एक स्पष्ट संदेश आहे की आमचे आतापर्यंतचे संबंध एक उच्चपातळीवर आहेत,परंतु अमेरिकेमध्ये ज्या प्रमाणे म्हटले जाते की, आपण आजून काहीही पहिले नाही, आम्ही या संबंधांना एक वेगळ्या स्तरावर, एका वेगळ्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत, असे जयशंकर म्हणाले.
भारतात पार पडलेली G२० शिखर परिषद आणि त्याला मिळालेले यश हे अमेरिकेच्या सहयोगाशिवाय शक्य झाले नसते, जयशंकर म्हणाले.ते म्हणाले, जेव्हा चांगल्या गोष्टी होतात, तेव्हा याचे श्रेय यजमानाला मिळते.हे बरोबर आहे, परंतु सर्व G२० सदस्य देशांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले नसते तर हे शक्य झाले नसते.
भारतीय-अमेरिकनांच्या टाळ्यांच्या कडकडाटात जयशंकर म्हणाले, “मी आज या देशात आहे, विशेषत: मी वॉशिंग्टनचा आभारी आहे की, G२० यशस्वी करण्यासाठी अमेरिकेकडून मिळालेले योगदान, सहकार्य आणि समज याबद्दल मी कृतज्ञ आहे.मिळालेले यश हे आमचे आहे परंतु मला असे वाटते की, हे यश G२० (राष्ट्रांचे ) आहे. माझासाठी भारत आणि अमेरिका या देशांच्या भागीदारीचे यश आहे.कृपया या भागीदारीला पाठिंबा देत राहा.मी तुम्हाला वाचन देतो की हे संबंध चंद्रावर जातील, कदाचित चांद्रयानाच्या पलीकडे जातील, ते पुढे म्हणाले.
हे ही वाचा:
ईदच्या जुलूसमधील टवाळखोरांकडून महिला पोलीस कॉन्स्टेबलची छेड, विक्रोळीत तणाव
सुप्रियाताई, विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नका, वास्तव समजून घ्या!
चांदिवलीमध्ये माकडांचा धुमाकूळ !
ते म्हणाले, “देश एकमेकांशी व्यापार करतात. देश एकमेकांशी राजकारण खेळतात. त्यांच्यात लष्करी संबंध आहेत, ते व्यायाम करतात आणि त्यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाण होते, परंतु जेव्हा दोन देशांमध्ये खोल मानवी संबंध असतात, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते. हे आज आमच्या संबंधांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.तसेच द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यात अनिवासी भारतीयांचे मोठे योगदान असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, हे शब्दामध्ये सांगितले जाऊ शकत नाही.याच आधारे आम्ही पुढे बघत आहोत.क्षितिजावर नवीन आशा पाहत आहोत… त्यामुळे, मला वाटते जेव्हा आपण क्षितिजाकडे पाहतो तेव्हा आपल्याला तिथे खरोखरच मोठ्या संधी दिसतात आणि हा समुदायच त्यांना शक्य करेल.”’मंत्री म्हणाले की, आजचा भारत पूर्वीच्या भारतापेक्षा वेगळा आहे.
मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी ज्याबद्दल बोलत आहे तो भारत संपूर्ण वेगळा आहे.जसे की तुम्ही इतरांकडून ऐकलं असेल, हा तो भारत आहे, जो चांद्रयान३ मिशन पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे.तसेच हा तो भारत आहे, जो शानदार पद्धतीने G२० परिषदेचे आयोजन करण्यात सक्षम राहिला आणि आम्ही २० देशांना एकत्र आणू शकणार नाही असे जे म्हणत होते त्यांना चुकीचे सिद्ध केले.
ते म्हणाले की, हाच भारत आहे ज्याने कोविड-१९ महामारीच्या काळात दाखवून दिले की तो केवळ आपल्या लोकांचीच काळजी घेऊ शकत नाही तर जगभरातील शेकडो देशांना मदतीचा हात पुढे करू शकतो.
जयशंकर म्हणाले की, आज भारतात सर्वात वेगवान ५G सेवा दिली जात आहे.ते म्हणाले,आज भारताच्या पावलांमध्ये ऊर्जा आहे, त्याच्या आवाजात आत्मविश्वास असेल तर त्याची अनेक कारणे आहेत.“कारण हे १० वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे…अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे आमची क्षमता दुप्पट किंवा तिप्पट झाली असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.